संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर राजापूरच्या पोकळीस्त नोंदी रद्द करणे विषयावरील महसूल मंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक – आमदार अमोल खताळ

  • पंजाबी कॉलनीतील पोकळीस्त नोंदी रद्द करणेबाबतही महसूलमंत्री सकारात्मक

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर व राजापूर येथील ७/१२ उताऱ्यावरील पोकळीस्त नोंदी तसेच शहरातील पंजाबी कॉलनी मधील सत्ताप्रकार नोंद कमी करणेबाबत तसेच इतर हक्कातून कब्जे दारांची नावे कमी करणे या विषयांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत पोकळीस्त नोंदी रद्द करणे बाबत सकारात्मक चर्चा झाली मात्र मुंबई मध्ये पाऊस सुरू असल्यामुळे पुढील आठवड्यात मंगळवारी महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेऊन या विषयावर पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.


संगमनेर शहरालगत गुंजाळवाडी गट नंबर ७९ व ९२,कसारा दुमाला ३२,३६ ,३७ व ३८समनापुर ५६ राजापूर २८,३० व,३८ या शेतकऱ्यांच्या गट नंबर वरील तसेच इंदिरानगर, मालदाडा रोड पोकळीस्थ व इतर हक्कातील कब्जेदार नोंदी रद्द करणेबाबत, संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनीमधील सिटी सर्व्ह नंबर १६५० ई वरील सत्ताप्रकार ही नोंद कमी करण्यासाठी तसेच ढोलेवाडी येथील सीताबाई विष्णू सूर्यवंशी यांच्या गट नंबर १८ आदिवासी जमिन चुकीच्या पद्धतीने व फसवणूक करून हस्तांतरित केलेली जमीन चौकशीची मागण्यांबाबत वरील गावातील नागरिकांनी आ अमोल खताळ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली होती .

त्यानुसार राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अप्पर मुख्यसचिव, जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी आणि भूमीअभिलेख उपाधीक्षक यांच्या समवेत बैठकीत वरील विषयांवर चर्चा करण्यात आली. परंतु मुंबईमध्ये सध्या पाऊस सुरू असल्यामुळे बैठक मध्ये आमदार अमोल खताळ हे ऑनलाईन उपस्थित होते. पुढील मंगळवारी पोकळीस्त नोंदी व इतर विषयावर ज्या काही अडचणी आहेत ते मार्गी लावूज विषय मार्गी लावण्याबाबत महसूलमंत्री यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मागील ४० वर्षापासून राजकीय द्वेषातून प्रलंबित राहिलेले विषय लवकर सुटणार असून नागरिकांना न्याय मिळेल अशी भावना आमदार खताळ यांनीं व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *