- आय लव्ह संगमनेर” या संस्थेच्या माध्यमातून विशेष अभियान !
- संगमनेरासह अहिल्यानगर जिल्यातील युवकांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन !
- संगमनेर तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी न “भूतो” न भविष्यती अशा विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन !
आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत असणारी ‘आय लव्ह संगमनेर’या संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आमदार सत्यजीत तांबे हे कार्यशील राजकीय नेते आहेत. युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करणे, युवकांसाठी ठामपणे भूमिका मांडणे, विकासवादी विचार व स्वतंत्र प्रवास ही त्यांची ओळख आहे. तरुणाईच्या ऊर्जेतून जनतेची सेवा करणारे सत्यजीत तांबे हे वेळोवेळी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम भूमिका मांडतात. त्याच अनुषंगाने आ. तांबे यांच्या वाढदिवसानिमित (दि.27 सप्टेंबर) रोजी संगमनेर तालुक्यातील तसेच अहिल्यानगर जिल्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणार असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा प्रकल्प प्रमुख प्रवीण शिंदे यांनी दिली.
बोलतांना शिंदे म्हणाले की, या स्पर्धा परीक्षा घेणारे विविध तज्ञ मार्गदर्शक 27 सप्टेंबर रोजी उपस्थित असणार आहेत पुढील 2 ते 3 दिवसांत याची प्रक्रिया सुरु होईल व 27 सप्टेंबर ला स्पर्धा परीक्षांचे भव्य आयोजन केले जाईल तसेच, मिनी पोलीस भरती, आर्मी भरती, पॅरा मिलिटरी भरतीसाठी प्रशिक्षण तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या विशेष सराव परीक्षा होणार आहे. विशेष बाब म्हणजे ग्राउंडवरील सर्व परीक्षा चीपद्वारे रेकॉर्ड केल्या जाणार आहेत. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहणे व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार असून या स्पर्धा परीक्षांची संपूर्ण माहिती लवकरच “आय लव्ह संगमनेर” (www.ilovesangamner.org) या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित होणार आहे.



