- भाजप राज्य परिषदेवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल दादाभाऊ गुंजाळ यांचा कोल्हेवाडी ग्रामस्थांच्यावतीने सन्मान
भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ यांनी सामान्य जनता, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी सातत्याने लढा दिला.त्यांच्या या कार्याची दखल भाजपने घेऊन त्यांना राज्य परिषदेवर संधी देत त्यांचा पक्षाने खऱ्या अर्थाने सन्मान केला असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ यांची भारतीय जनता पार्टी राज्यपरिषद सदस्य पदी निवड झाली त्यानिमित्त कोल्हेवाडी ग्रामस्थांच्यावतीने आ. अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते बी. आर. वामन यांनी भूषविले, यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत एस. झेड. देशमुख, भाजप ज्येष्ठ नेते वसंत गुंजाळ, वसंतराव देशमुख, ऍड. सदाशिव थोरात, बापूसाहेब गुळवे, डॉ. सोमनाथ कानवडे, कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णा दिघे, भास्कराव दिघे, प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन राहुल दिघे, मोहन वामन नानासाहेब खुळे, सतीश वाळुंज, अमोल दिघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले कि, दादाभाऊं गुंजाळ यांच्यामध्ये असलेली तळमळ, आत्मियता, आणि माणूसपण यातूनच त्यांचे सर्वसामान्यांच्या विषयी असलेले प्रेम दिसून येत आहे. त्यांनी भाजपचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे, सूर्यभान वहाडणे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांसोबत काम केले आहे, त्यांच्या प्रेमामुळे खऱ्या अर्थाने आपली ओळख वाढल्याचे नमूद केले आणि दादाभाऊंकडून मिळालेल्या शिकवणींचा उल्लेख करून ते म्हणाले की जसे की दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती समाधान असलं की आपल्याला कोणतीही गरज वाटत नाही. दादाभाऊ हे कायम शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले, दादाभाऊंनी पक्षात प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेचे कामे केली म्हणूनच भाजपने त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्यपरिषदेवर त्यांची निवड केली असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
सुमारे साडेतीनशे ते चारशे गावांचे रस्त्यांचे प्रस्ताव राज्य व केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. जुने-नवे नेते एकत्र घेऊन या तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. दादाभाऊंसारख्या कार्यकर्त्यांनी ज्या निष्ठेने काम केले, तेच आपल्याला पुढे घेऊन जायचं असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाळुंज यांनी केले तर प्रास्तविक भास्करराव दिघे आणि प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन राहुल दिघे यांनी करून सर्वांचे आभार मोहन वामन यांनी मानले.
- दादाभाऊ हा दादागिरी करणारा नाही तर सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारा दादा आहे. त्यांनी कोल्हेवाडी या गावासाठी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत म्हणूनच त्यांचा भाजपाने राज्यपरिषदेवर सदस्यपदी निवड करून सन्मान केला आहे दादाभाऊ गुंजाळ यांचा हा सन्मान हा त्यांचा एकट्याचा सन्मान नसून सर्व सामान्य तळागाळातील जनतेचा सन्मान आहे.
- वसंतराव गुंजाळ – ज्येष्ठ नेते भाजपा
- दादाभाऊ आणि अमोलभाऊ ही जोडी संगमनेरच्या विकासासाठी आदर्श आहे. त्यांच्या कार्यामुळे संगमनेरमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडले आहे. पूर्वी यांना कोणीच आठवत नव्हते परंतु आमदार अमोल खताळ यांच्या रूपाने परिवर्तन झाले त्यानंतर त्यांना आता खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि आषाढी एकादशी सुद्धा आठवायला लागली.
- प्राध्या. एस.झेड. देशमुख – अध्यक्ष, पतीत पावन संघटना
- पुढील काही महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये हेराफेरी होण्याची दाट शक्यता आहे त्यावर बारीक लक्ष ठेवा आणि या सर्व निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी एकत्र या.
- वसंत देशमुख – ज्येष्ठ नेते भाजपा



