गुढीपाडवा हिंदू अस्मितेची आठवण करून देणारा सण – आमदार अमोल खताळ

आ.अमोल खताळ यांनी उभारली कुटुंबीयांसह पारंपरिक पद्धतीने गुढी

गुढीपाडवा सण म्हणजे नवे संकल्प, नवी ऊर्जा आणि आशा घेऊन येणारा प्रेरणादायी क्षण असून आपल्या समृद्ध संस्कृतीची व हिंदू अस्मितेची आठवण करून देणारा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, असे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आमदार खताळ यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत साई हर्ष निवास स्थानी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ बंधू राहुल खताळ आणि कुटुंबीय उपस्थित होते.


आमदार खताळ म्हणाले की, “गुढीपाडवा हा सण केवळ नववर्षाची सुरुवात नसून नवीन सकारात्मक विचार आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. या दिवशी उभारलेली गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे.”तसेच , या नववर्षात सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य, यश आणि भरभराट नांदो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येत आनंद, एकोपा आणि सकारात्मकतेने नववर्ष साजरे करावे, असे आवाहन आ खताळ यांनी केले त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *