कै. संजय घोलप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ परिवाराने शेतात रक्षा विसर्जित करत केले वृक्षारोपण

संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे भूषण आदर्श व्यक्तिमत्व कै. संजय रायभान घोलप यांचे रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुले,भाऊ,चुलते असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

घोलप परिवाराने त्यांच्या स्मृती चिरंतर आठवणीत राहण्यासाठी काकडवाडी ता. संगमनेर निवासस्थानी त्यांची रक्षा शेतात विसर्जित करून त्या ठिकाणी चिकूच्या झाडाची लागवड केली आहे. यानिमित्ताने घोलप परिवाराने पर्यावरण पूरक संदेश देत आदर्शवत कार्य हाती घेऊन स्तुत्य प्रेरणा देणारा उपक्रम केला आहे.

कै. संजय रायभान घोलप यांची ओळख म्हणजे ते उत्कृष्ट क्रिकेटर, समालोचक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तसेच संगमनेर येथे असणाऱ्या पहिल्या सेतू सुविधा कार्यालयाचे ते मॅनेजर होते, संपूर्ण तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या पाठीमागे आई भागुबाई, पत्नी सुवर्णा तसेच उत्कर्ष ,संघर्ष आणि जीत असे 3 मुले आहेत. तसेच काही सख्खे चुलत भाऊ, चुलते असे मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *