संगमनेर विधानसभा मतदारसंघात एक वर्षापूर्वी घडलेला राजकीय भूकंप आजही अनेकांच्या स्मरणात आहे. अनेक दशके कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जागेवर महायुतीचे युवा नेते आमदार अमोल धोंडीबा खताळ यांनी विजय मिळवला.एका सामान्य कार्यकर्त्यांमधून लोकप्रतिनिधी बनलेल्या खताळ यांनी हे पहिले वर्ष केवळ विकासावरच नव्हे, तर जनसेवा,प्रशासकीय गतिमानता,विधिमंडळातील सक्रियता, सांस्कृतिक एकोपा या चतुसूत्रीवर आधारित ठेवले. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी एकही दिवस न थांबता काम केले, ज्यामुळे संगमनेरच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.
अमोल खताळ यांचा विजय हा केवळ व्यक्तीचा विजय नव्हता, तर युवा नेतृत्वाच्या आणि बदलाच्या इच्छेचा विजय होता

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर खताळ यांनी विधीमंडळाच्या पायरीवर डोके टेकवून केलेला नमस्कार, हा त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्याच्या नम्रतेचे प्रतीक होता. या कृतीतून त्यांनी जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा आपला संकल्प अधोरेखित केला.अधिवेशनांदरम्यान त्यांनी संगमनेरच्या ज्वलंत समस्यांना प्रभावीपणे वाचा फोडली.
माजी मंत्र्यांचा मतदारसंघ असूनही अनेक प्रश्न प्रलंबित होते. आमदार खताळ यांनी राज्य सरकारमधील आपले स्थान आणि युवा नेतृत्वाचा प्रभाव वापरत, मतदारसंघात ५०० कोटींहून अधिक निधीच्या विकास कामांना मंजुरी मिळवली.
प्रमुख कामे –
- राज्य महामार्ग सुधारणा,संगमनेर शहरातून जाणाऱ्या मुख्य राज्य महामार्गांची दुरूस्ती आणि चौपदरीकरण.
- ग्रामीण रस्ते जोडणी,पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत,”तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्या मुख्य रस्त्यांशी जोडल्या.
- शहर अंतर्गत नागरी सुविधा,विशेष नागरी निधी,”शहरातील प्रमुख वॉर्डांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते, पथदिवे आणि भूमिगत गटार योजनांची सुरुवात.
- जलसंधारण आणि पाणीपुरवठा योजना, निळवंडे कालवा,पाणीपुरवठा योजना, बंधारे कामांसाठी
- स्थानिक पर्यटन विकासाला चालना, पर्यटन विकास निधी,तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी आराखडा तयार.
संगमनेरमध्ये पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी सिंचन हे प्रमुख विषय आहेत. आमदार खताळ यांनी या संवेदनशील विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निळवंडे कालवा प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रशासकीय आणि मंत्रालयीन बैठका घेऊन राहिलेले अडथळे दूर केले. कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा संकल्प आहे.
त्यांनी अनेक ग्रामीण भागांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळवून दिली, ज्यामुळे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे शक्य झाले आहे.
पावसाळ्यापूर्वी अनेक गावांमधील गावतलाव आणि पाझर तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले, ज्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली
अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित आणि भरीव मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी सभागृहात आग्रही भूमिका घेतली.तालुक्यात उद्योग आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर तसेच स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
आमदार खताळ यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात जनतेच्या सेवेसाठी एकही दिवस खंड पडू दिला नाही.त्यांनी आपल्या कार्यालयात नियमित जनता दरबार सुरू ठेवून नागरिकांना थेट भेटण्याची सोय उपलब्ध करून दिली. सामान्य नागरिकाचे काम कोणाकडेही न अडता, थेट मार्गी लावण्यावर त्यांचा कटाक्ष राहिला.
शासकीय कार्यालयातील लाल फितीचा कारभार थांबविण्यासाठी, ते स्वतः अनेकदा तहसील किंवा पालिका कार्यालयांमध्ये उपस्थित राहून लोकांच्या समस्या जागेवर सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले. यामुळे प्रशासनालाही जनहिताच्या कामांमध्ये अधिक सक्रियता दाखवावी लागली.
तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन गाठीभेटी घेण्यावर आणि स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
विकासासोबतच सामाजिक व सांस्कृतिक एकोपा जपण्यावर आमदारांनी भर दिला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचा उत्सव त्यांनी पारंपरिक आणि भव्य स्वरूपात आयोजित करण्यात पुढाकार घेतला, ज्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्माफुले,वि.दा.सावरकर,अहिल्याबाई होळकर, संभाजी महाराज,महावीर जयंती इतर राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी अत्यंत आदराने आणि सामाजिक संदेशासह साजऱ्या करून त्यांनी सर्व समाजघटकांना सोबत घेण्याची भूमिका स्पष्ट केली.स्थानिक यात्रा,जत्रा आणि गणपती, नवरात्रि, दहीहंडी,महेश नवमी,आदी धार्मिक उत्सवांमध्ये ते सक्रियपणे सहभागी झाले, ज्यामुळे ग्रामीण भागातील जनतेशी त्यांचा भावनिक संवाद मजबूत झाला.
राजकारणात काम करताना विरोध आणि आव्हाने अपरिहार्य असतात. आमदार खताळ यांनी आलेल्या राजकीय टीका आणि विरोधकांच्या कुरघोडींवर विकासाच्या कामांनीच उत्तर दिले.
‘राजकारण बाजूला ठेवून विकास कामे करा’ या मुख्यमंत्री महोदयांच्या मंत्रावर विश्वास ठेवत त्यांनी विरोधी पक्षाच्याही भागातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला
आमदार खताळ यांनी ज्या धडाडीने मतदारसंघातील कामे मार्गी लावली, त्यामुळे महायुतीमध्ये त्यांचे राजकीय स्थान मजबूत झाले आहे.
युवा आणि क्रियाशील नेतृत्व म्हणून पक्षीय नेतृत्वाने त्यांच्यावर अधिक विश्वास दाखवला असून, ते राज्यातील इतर मतदारसंघांसाठीही अनेकदा रणनीती आखताना दिसत आहेत. त्यांचा आत्मविश्वास, विकास कामांवरील पकड आणि जनतेला दिलेला वेळ, या तिन्ही गोष्टींमुळे त्यांचा राजकीय आलेख सतत उंचावत आहे.
आमदार अमोल खताळ यांच्या आमदारकीचे हे पहिले वर्ष अपेक्षापूर्ती, विकासाची गतिमानता आणि जनसंपर्काचे प्रभावी मॉडेल म्हणून ओळखले जात आहे. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आमदार झाल्यावर मतदारसंघाचा कायापालट कशा प्रकारे करू शकतो, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.आमदार अमोल खताळ त्यांनी फक्त आश्वासने दिली नाहीत, तर प्रत्यक्षात कृती करून दाखवली. जनतेच्या सेवेसाठी एकही दिवस न थांबता काम करण्याची त्यांची निष्ठा संगमनेर तालुक्यासाठी विकासाचे दीपस्तंभ ठरली आहे.
लेखन: राहुल सोमवंशी (जहागिरदार)



