संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी खताळ यांचा खोटारडेपणा उघड !

  • तुषार पडवळ हा त्यांचाच कार्यकर्ता
  • खोटे व्हिडिओ बनवण्याचा धंदा बंद करा अन्यथा तरुणाईचा उद्रेक होईल
  • संतप्त तरुणांचा खताळ यांना इशारा

संगमनेर तालुक्यामध्ये मागील एक वर्षापासून अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. या मागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. संगमनेर चे नवीन लोकप्रतिनिधी खोटी माहिती आणि व्हिडिओ प्रसारित करत असून निष्पाप तरुणांचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. आरोपी असेल त्यांना नक्की शिक्षा करा. मात्र निरपराध लोकांचे व्हिडिओ बनवू नका अन्यथा  यापुढील काळात असा उद्योग केल्यास तालुक्यातील तरुणांच्या प्रचंड उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा व्हिडिओ बाधित युवकांनी खताळ यांना दिला आहे तर खोटे बोलून तालुक्याची बदनामी  करणे थांबवा असे आवाहन बाबा ओहोळ यांनी केले आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे संगमनेर चे नवीन लोकप्रतिनिधी यांनी तयार केलेल्या व्हिडिओंबाबत पत्रकार परिषद झाली यावेळी राज्य सरकार संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ तालुकाध्यक्ष अजय फटांगरे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, व्हिडिओ बाधित युवक साईराज कांदळकर सार्थक कांदळकर अक्षय दिघे आदींसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपूर अधिवेशन सुरू असताना संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी यांनी काही खोटे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये पसरवले यामध्ये जे युवक आहेत ते तळेगाव दिघे येथील असून त्यांनी नवीन थार गाडी घेतल्यानंतर गणेश कारखान्याच्या निकालाच्या दिवशी पूजनासाठी आणली होती यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे उपस्थित होते. यावेळी चे सर्व व्हिडिओ आणि फोटो या युवकांनी दाखवले. याचबरोबर खताळ यांच्या यंत्रणे मार्फत फिरणारा व्हिडिओ सुद्धा दाखवला यामध्ये जो तुषार पडवळ म्हणून दाखवला आहे तो सार्थक कांदळकर आहे.

यावेळी सार्थक कांदळकर म्हणाला की माझ्या बहिणीचे लग्न होते आणि त्या दिवशी हा व्हिडिओ बाहेर आला त्या दिवशी सर्व नवीन पाहुणे तू गांजाचा व्यवसाय करतो की काय असा प्रश्न विचारू लागले त्यामुळे माझ्या घरच्यांना आणि सर्वांना प्रचंड मनस्ताप झाला. हा माझे आयुष्य उध्वस्त करण्याचा डाव आहे. तर साईराज कांदळकर म्हणाला की लोकनेते बाळासाहेब थोरात व आमच्या घरचे यांचे संस्कार चांगले आहेत .आम्ही कधीही वाईट मार्ग केले नाही. कष्टाने काम करतो. कृपया अशी खोटी बदनामी थांबवा.

यानंतर तुषार पडवळ हा अमोल खताळ यांचाच कार्यकर्ता असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट झाले. तर बाबा ओहोळ म्हणाले की, संगमनेर तालुक्याला एक चांगल्या राजकारणाची परंपरा आहे मात्र नवीन लोकप्रतिनिधी खोटी व्हिडिओ बनवत आहे आणि तालुक्याची बदनामी करत आहे तुम्ही काम करा. निधी आणा. मात्र खोट्या गोष्टी दाखवून बदनामी करू नका अन्यथा तालुका तुम्हाला माफ करणार नाही.

तर अजय फटांगरे म्हणाले की कुठे फोटो दाखवून तालुक्याची होणारी बदनामी तालुक्यातील युवक कधीही सहन करणार नाही.यावेळी सर्व युवकांनी आपण सोशल मीडियावर झालेल्या बदनामीच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात असल्याचे सांगितले.

संगमनेरची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीचा राज्यातून निषेध

राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सभोवती कायम तरुण पिढीचा गराडा असतो. राजकीय नेते युवक कार्यकर्त्यांना नाराज करत नाही. मात्र चुकीचे फोटो दाखवून संगमनेरचे लोकप्रतिनिधी यांनी संगमनेरची केलेली बदनामी राज्य सहन करणार नाही तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या आणि संगमनेर तालुक्या बद्दल  टिपणी करणाऱ्या प्रवृत्तीचा  राज्यभरातून निषेध होत असल्याचे बाबा ओहोळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *