आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत

जवळे कडलग येथील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मयत झालेल्या सिद्धेश सुरज कडलग यांच्या कुटुंबीयांना आमदार सत्यजित तांबे यांच्या तातडीच्या पाठपुराव्यातून 10 लाख रुपयांची मदत महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाच्या वतीने देण्यात आली असून सकाळी आंदोलनात दिलेला शब्द आमदार तांबे यांनी कृतीसह पाठपुराव्यातून 6 तासात पूर्ण केला.

13 डिसेंबर 2025 रोजी जवळेकडलग येथील चार वर्षीय सिद्धेश सुरज कडलक याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा ही मागणी वारंवार होत आहे. याकरता आमदार सत्यजित तांबे डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर मध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. या मोर्चामध्ये सिद्धेश कडलग याचे वडील सुरज कडलग सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाने अत्यंत असंवेदनशीलपणा दाखवल्याने आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर प्रशासन नरमले.

याचबरोबर फक्त सहानुभूती न दाखवता कडलग कुटुंबीयांना सरकारने तातडीची मदत करावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली. यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून सिद्धेश कडलक यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली. वनमंत्री गणेश नाईक यांनी त्वरित आमदार सत्यजित तांबे यांच्या 15 डिसेंबर 2025 जा. क्रमांक 934 पत्रानुसार उपवनसंरक्षक अहिल्यानगर यांच्या कार्यालयामार्फत तातडीने 10 लाख रुपयांची मदत दिली आहे.

सकाळी आंदोलनामध्ये आक्रमक पवित्रा घेत बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना मदत मिळावी अशी आक्रमक मागणी करणारे आमदार तांबे यांनी पाठपुरावा करून तातडीने मदत मिळून दिल्याबद्दल जवळेकडलग ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा वनमंत्र्यांना फोन

संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले सातत्याने वाढत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रभावी उपाययोजना करावी याकरता महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना फोन केला. त्यानंतर नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश देण्यात आले. याचबरोबर बिबट्याच्या हल्ल्यातील कुटुंबीयांना मदत आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *