शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी – बाळासाहेब थोरात

  • माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पठार भागात पारंपारिक पद्धतीने जंगी मिरवणूक
  • लेझीम पथक व पारंपारिक नृत्यसह पुष्पवृष्टीसह लोकनेत्याची जंगी मिरवणूक
  • लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी पठार भाग एक वाटला
  • सहकारी संस्थांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मदत – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

ढोल ताशांचा गजर, तरुणाईचा उत्साह, चार जेसीबी मधून पुष्पवृष्टी आणि धनगरी नृत्यसह महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे पठार भागातील तरुण व युवकांनी केलेले जंगी स्वागत. याचबरोबर नागरिक महिला व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत झालेली भव्य मिरवणूक लक्षवेधी ठरली असून सहकारातून सर्वसामान्य नागरिकांना मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी केले आहे.

पठार भागातील बिरेवाडी येथे सेवा सोसायटीची इमारत व दूध उत्पादक संस्थेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या मिरवणुकीत व कार्यक्रम प्रसंगी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड माधवराव कानवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, गणपतराव सांगळे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर , सौ मीराताई शेटे,रामदास धुळगंड, शांताराम कढणे, सचिन खेमनर जयराम ढेरंगे, भाऊसाहेब डोलणार , पांडुरंग सागर ,सुदाम सागर, बाळासाहेब सागर, सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब ढेंबरे ,व्हाईस चेअरमन ईश्वर सागर, दूध संस्थेचे चेअरमन पांडुरंग ढेंबरे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब गळंगे आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांची पारंपारिक पद्धतीने बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली याचबरोबर 4 जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली . तरुणाईने लेझीम पथकावर धरलेला ताल आणि पारंपारिक पद्धतीच्या धनगरी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीमध्ये तरुण व नागरिकांचा मोठा उत्साह होता.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार चळवळ ही गोरगरिबांच्या समृद्धीचे साधन आहे. सहकारामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी रुजविलेले आदर्श तत्व हे देशासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. संगमनेरच्या शिखर संस्था उत्कृष्ट काम करत असून गाव पातळीवरील संस्थांची त्यांना जोड आहे. या सहकारी चळवळीच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत होत आहे. सहकार या आपल्या तालुक्याचे वैशिष्ट्य आहे आपल्याला जपायचे आहे .

पठार भागाने आपल्यावर कायम प्रेम केले आहे. बिरेवाडी मध्ये उभ्या राहिलेल्या इमारती या अत्यंत आदर्शवत असून यामधून सर्वसामान्यांची कामे होणार आहे. या वैभवशाली इमारती या गावची समृद्धी दर्शवत आहे . अत्यंत सुंदर इमारत या गावांमध्ये उभी राहिली आहे यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांचे कौतुक आहे.

 चाळीस वर्षात एकही दिवस विश्रांती न घेता आपण काम केले अगदी परदेशात असलो तरीही मतदारसंघाच्या कामांचा विचार केला. परिश्रमातून हा तालुका फुलवला. आज तालुका उभा आहे तो एका दिवसात राहिलेला नाही. त्यामागे कुणाचे तरी कष्ट आहे. राजकारणाची चांगली परंपरा आपण निर्माण केली. कधीही भेदभाव केला नाही. मात्र मागील एक वर्षापासून तालुका अस्वस्थ आहे. राजकारणाची दुरुस्ती आपल्या सगळ्यांना करायची आहे. ही चांगली परंपरा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा असे आवाहन त्यांनी केले.

तर ॲड माधवराव कानवडे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारातील सर्व संस्था काम करत आहेत. दूध व्यवसाय हा तालुक्याचा प्रमुख व्यवसाय ठरला असून सेवा सोसायटीच्या माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यांना मदतीची भूमिका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे.

तर शंकर पाटील खेमनर म्हणाले की, पठार भागातील प्रत्येक वाडी वस्तीच्या विकासासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम निधी दिला आहे. या भागाचा विकास व्हावा यासाठी पाठपुरावा केला आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता म्हणून राज्यभर त्यांची ओळख आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकरता त्यांचा कायम आग्रह राहिला आहे. या वैभवशाली इमारती पठार भागासाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी , विठ्ठल सागर, नानासाहेब गळंगे, भागा गळंगे, नवनाथ ढेंबरे, एकनाथ ढेंबरे, मारुती गळंगे, भास्कर सागर, ज्ञानदेव ढेंबरे, सुभाष सागर, जना कोळपे, किसन ढेंबरे, संदिप भोसले, संतोष ढेंबरे, बाबाजी ढेंबरे, प्रल्हाद आंबेकर,किसन शेंडगे, सीमा सागर, पार्वताबाई सागर, नवनाथ सागर, संदिप सागर, निवृत्ती सागर, पंढरीनाथ सागर, तसेच सर्व संचालक, सेल्समन, कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चेअरमन अण्णासाहेब ढेंबरे व पांडुरंग ढेंबरे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गडांगे यांनी केले तर अण्णासाहेब ढेंबरे यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *