सीमा अनिल सोमणी यांचे दुःखद निधन
संगमनेर तालुक्याच्या साहित्य विश्वामध्ये आपले स्थान निर्माण करणारे सेवा निवृत्त नायब तहसीलदार तथा लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांचे स्वीय सहाय्यक अनिल सोमणी यांच्या पत्नी सौ. सीमा अनिल सोमणी यांचे दुःखद निधन झाले आहे.

पुणे येथे अल्पशा आजाराने सौ सीमा अनिल सोमणी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धार्मिक वृत्ती सेवाभाव आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या सौ सीमा ताई यांनी कायम माणसे जोडण्याची काम केले. अनिल सोमणी हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात ते जबाबदारी सांभाळत आहेत. याचबरोबर साहित्यिक, आणि अभिवाचक म्हणून ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये अत्यंत लोकप्रिय झाले आहे प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होताना त्यांनी अनेकांना मोठी मदत केली आहे. जिव्हाळा आपुलकी आणि सेवाभाव हे व्रत त्यांनी कायम जपले आहे. इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर करताना अभिवाचनाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला बळकटी दिली आहे.
सौ सीमा अनिल सोमणी यांच्या पश्चात पती, मुलगा ,मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा मुलगा व मुलगी, जावई पुणे येथे मोठ्या आयटी कंपनीमध्ये कार्यरत आहेत . त्यांचा दशक्रिया विधी शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता नाशिक येथे रामकुंडावर होणार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे माजी बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, यांच्यासह यशोधन परिवार व संगमनेर साहित्य परिषद, महसूल विभाग मित्र परिवार यांनी शोक व्यक्त केला आहे.



