राज्य सरकारने फक्त मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. संगमनेर मधील नवीन लोकप्रतिनिधीने मागील एक वर्षात कोणताही निधी न आणता फक्त मंत्र्यांना भेटणे आणि मागणीचे पत्र देणे आणि जाहिरात बाजी करणे एवढेच काम केले असल्याची टीका सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.

संगमनेर शहरामध्ये फ्लेक्सच्या माध्यमातून विद्रूपीकरणानंतर ते बोलत होते यावेळी बोलताना दिवटे म्हणाले की मागील एक वर्षापासून संगमनेर बस स्थानकासह संगमनेर मधील विविध रस्त्यांवर अनाधिकृत फ्लेक्स लागली आहेत. याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली परंतु प्रशासन हे महायुती सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याने संगमनेर मध्ये अनेक विकासाचे कामे खोळंबली.
याचबरोबर ट्रॅफिक समस्या रस्त्यांच्या समस्या अशा अनेक समस्या निर्माण झाल्या यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नवीन लोकप्रतिनिधीने समस्या सोडवण्याऐवजी फक्त फ्लेक्स बाजी केली आहे. विकासासाठी कोणताही निधी आणला नाही फक्त मंत्र्यांना भेटून फोटो बाजी केली आहे सध्या सरकारकडे कोणताही निधी नाही त्यामुळे कोणताही निधी संगमनेर साठी मिळाला नाही फक्त जाहिरात बाजी सुरू आहे.
जनतेला काम हवे असून मागील काळामध्ये शाश्वत विकासाच्या योजना राबवल्या गेल्या शांत सुरक्षित आणि सुसंस्कृत शहर घडवले हे संपूर्ण राज्याला माहित आहे मात्र आता मागील काही महिन्यांपासून शहरात वाढलेली अशांतता असुरक्षितता आणि अमली पदार्थांची तस्करी हा मोठा चिंतेचा विषय झाला असून मूलभूत गोष्टींकडून लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहे.
संगमनेर मध्ये कोणताही विकासाचा निधी आला नाही उलट संगमनेरचा निधी बाहेरच्या तालुक्यांमध्ये पळवला गेला. संगमनेरचे कामकाज बाहेरच्या इशारांवर सुरू आहे. हे सर्व नागरिकांना माहीत आहे. त्यामुळे खोटी जाहिरात बाजी संगमनेरातील सुजाण नागरिक ओळखून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.



