काँग्रेसचे सुभाष सांगळे यांच्या खोट्या पत्राला शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांचे सडेतोड उत्तर
संगमनेर तालुक्यासाठी पर्यटन विकास योजनेतून आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याने २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र तळेगाव गटातून निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे हे राजकीय स्वार्थासाठी मागील वर्षाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल करून आमदार अमोल खताळ यांची बदनामी करत असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांनी केली आहे.


संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील जगदंबामाता मंदिरात एका कार्यक्रमा निमित्त आमदार अमोल खताळ गेले होते .त्यावेळी मंदिराच्या विकासासाठी निधी द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.या मंदिराच्या विकासासाठी निधी दिला जाईल असा शब्द आ खताळ यांनी ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार राज्याचे पर्यटन विकासमंत्री शंभूराज देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन संगमनेर तालुक्यातील मंदिरांच्या सुशोभीकरणासाठीनिधी देण्यात यावा असे पत्र दिले होते. मंत्री देसाई यांनी देवकौठे येथील जगदंबा माता मंदिर सुशोभीकरण कामासोबतच संगमनेर तालुक्यातील ९ मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी रुपये मंजूर केले आहे.
देवकौठेसह इतर९ गावातील मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी राज्याचे पर्यटन विकास मंत्री आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांनी मंजूर केला आहे. मात्र पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे मागील वर्षी विधानसभा निवडणूक अगोदरचे पत्र युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे यांनी सोशल मीडियावर टाकून हा निधी आमदार सत्यजित तांबे यांच्यामुळेच मिळाला असल्याचे सोशल मीडियातून व्हायरल करत जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याची टीका घोरपडे यांनी केली.


सत्यजित तांबे हे पदवीधर आमदार आहेत, पदवीधर आमदाराला की विधानसभा आमदाराला तालुक्यातील विविध विकासकामासाठी निधी मिळतो याचा अगोदर सांगळे यांनी अभ्यास करावा आणि मगच आमदार खताळ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करावेत. तसेच सर्वप्रथम आमदार तांबे यांनी दोन कोटीचा निधी आणून दाखवावा आणि मगच यांचे श्रेय घ्यावे अशी टीका घोरपडे यांनी केली. आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कॉंग्रेसवाले असे चुकीचे वृत्त तयार करून जनतेची दिशाभूल करत आहेत. अमृत उद्योग समूहाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरी करणाऱ्याने आपल्या देवकौठे गावासाठी चाळीस वर्षात किती रुपयांचा निधी आणला हे आधी जाहीर करावे आणि मगच असे खोटे आरोप करावेत अशीही टीका घोरपडे यांनी केली आहे.
देवकौठे गावातील जगदंबा माता मंदिराच्या कामासाठी 50 लाखांचा निधी मंजूर केला यासाठी आमदार अमोल खताळ यांचे मनःपूर्वक आभार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून आमच्या गावातील मंदिरच्या सुशोभीकरणासाठी निधी मिळाला आहे. परंतु काहीजण राजकीय स्वार्थापोटी श्रेय घेत आहेत. जर त्यांच्या नेत्यांनी हा निधी आणला असं म्हणत असतील तर मग गेल्या चाळीस वर्षात निधी का आला नाही? हे जनतेसमोर श्रेय घेणार्यांनी जाहीर करावे.
एकनाथ मुंगसे – (महायुती देवकौठे)
जगदंबा माता मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या 50 लाख रुपयांच्या निधीचे श्रेय आमदार अमोल खताळ यांचेच आहे. हा निधी मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. तिथून पुढे तो मंत्रालयात गेला परंतु विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे तो प्रलंबित होता मात्र आमदार अमोल खताळ यांनी पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सतत पाठपुरावा केला असल्यामुळेच हा निधी मजूर झाला आहे.
सुनील मुंगसे – (देवकौठे ग्रामस्थ)



