संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भोसले यांचे पुतणे श्रेयस संजय भोसले यांचं दुःखद निधन झालं. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भोसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय.

यावेळी आमदार अमोल खताळ, शिवसेना प्रवक्ता संजीव भोर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजप तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले,शौकत जहागीरदार, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, अण्णासाहेब बाचकर, हरिभाऊ गीते, बाबाजी सागर,यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साकुर पठार भागामध्ये बालाजी उद्योग समूह हा सर्वात मोठा उद्योग समूह असून एक सुशिक्षित कुटुंब म्हणून या भोसले कुटुंबाची ओळख आहे. तर त्यांच्या या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत, या दुःखातून लवकर सावरण्याची शक्ती तुम्हाला ईश्वर देवो अशी श्रद्धांजली, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्पण केली.



