संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत असणाऱ्या ‘आय लव्ह संगमनेर’ च्या माध्यमातून दि. 16 नोव्हेंबर रोजी संगमनेर “श्री” चं म्हणजेच बॉडी बिल्डिंग (शरीरसौष्ठव) स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा शहरातील युवक-युवतींना फिटनेस, स्नायूंचा विकास आणि शरीरसौष्ठव प्रदर्शन करण्याची संधी देण्यासाठी आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचे आयोजन संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे होणार असून या स्पर्धेत पुरुष आणि महिला Classic, Physique व Fitness अशा विविध विभागांमध्ये सहभागी होऊ शकतील. अशी माहिती प्रकल्प प्रमुख नचिकेत खोले यांनी दिली.

यावेळी बोलतांना खोले म्हणाले की, आमदार सत्यजीत तांबे हे कार्यशील राजकीय नेते आहेत. युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करणे, युवकांसाठी ठामपणे भूमिका मांडणे, विकासवादी विचार व स्वतंत्र प्रवास ही त्यांची ओळख आहे. तरुणाईच्या ऊर्जेतून जनतेची सेवा करणारे सत्यजीत तांबे हे वेळोवेळी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम भूमिका मांडतात. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले आय लव्ह संगमनेर हे सामाजिक क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत आहे.
यावेळी प्रामुख्याने स्पर्धक आपल्या स्नायूंच्या आकार, संतुलन आणि पोझेस सादर करतील. तज्ज्ञ जजेसमार्फत योग्य मूल्यांकन केले जाईल आणि विजेत्यांसाठी ट्रॉफी, मेडल्स व रोख बक्षिसे प्रदान केली जातील. तरी इच्छुक स्पर्धकांनी लवकरच (ilovesangamner.org) या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व आपला सहभाग सुनिश्चित करावा. शहरातील फिटनेसप्रेमी आणि नागरिकांसाठी ही स्पर्धा निश्चितच उत्साही आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
फिटनेस हीच खरी फॅशन !
समाजातील युवकांनी खऱ्या अर्थानं नशा मुक्ती कडे गेलं पाहिजे. नशा मुक्ती साठी आपण ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करत आहोत जेणेकरून जे युवक आहेत त्यांनी नशेकडे न जाता आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे हेच माझं ध्येय आहे. तरुण चांगल्या मार्गाला लागतील. हीच माझी अपेक्षा आहे.
- आमदार सत्यजीत तांबे



