साकूर पठार भागातील भाजपचे ज्येष्ठ नेते बुवाजी पाटील खेमनर यांचे दुःखद निधन

तालुक्यातील साकूरच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आलीय. भाजपचे नेते बुवाजी पा. खेमनर यांचं अल्पशा आजाराने निधन झाले आहे. पुण्यात जहांगिर हॉस्पिटलमध्ये त्यांनी दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे पठार भागावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 

साकूर पठार भागाची बुलंद तोफ म्हणून बुवाजी पा. खेमनर यांची ओळख होती. तसेच एक आक्रमक भाषण ठोकणारा नेता म्हणून कायमच ते चर्चेत असायचे. समाजकारण, धार्मिक, शैक्षणिक तसेच राजकारणात त्यांचं नावलौकिक होत. बुवाजी पा. खेमनर यांच्या अचानक जाण्याने पठारभागाला धक्का बसला आहे. साकुर पठार भागातील विखे पाटील कट्टर समर्थक म्हणून बुवाजी पाटील खेमनर यांची ओळख होती.  राजकारणापलीकडे एक मैत्री जपणारा नेता आज हरवला आहे, त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *