सी न्यूज मराठीने बातमी प्रसिद्ध केली आणि रस्त्याची डागडुजी झाली, तो खड्डा तात्काळ बुजवला !
संगमनेर तालुक्यातील साकूर-मांडवे रोड वरती हवालदार वस्ती या ठिकाणी एक मोठा खड्डा पडला होता. तर त्या खड्ड्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. या प्रकारावर आवाज उठवत सी न्यूज मराठी चॅनेलने २९ सप्टेंबरला बातमी प्रसारित केली आणि २४ तास उलटत नाही तोच संबंधित प्रशासनाने गंभीर दखल घेत तात्काळ हा खड्डा बुजवलाय.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यतत्परतेमुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं असून कायमस्वरूपी उपाययोजना होण्यासाठी या संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.
प्रतिनिधी – रमजान शेख



