संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावामध्ये बस सुरू करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांना शिवसेना शाखाप्रमुख किरण पाटीलभाऊ कुदनर यांचे निवेदन

संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावांमध्ये, काही दिवसापूर्वी बस सुरू होती, परंतु मध्येच पाच सहा महिन्यापूर्वी ती बस बंद झाली आहे. तर या बंद झालेल्या बसमुळे शिंदोडी येथील शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची मोठी गैर होत असून लवकरात लवकर बस सुरू करावी असं निवेदन शिंदोडी गावचे शिवसेना शाखाप्रमुख किरण पाटील भाऊ कुदनर यांनी संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांना निवेदन दिले आहे.

जर ही बस सुरू झाली तर विद्यार्थ्यांना त्वरित कॉलेजमध्ये तसेच ग्रामस्थांना सकाळी आपल्या कामावरती लवकरात लवकर जाता येईल, यासाठी हे निवेदन दिले असून याकडे त्वरित आमदार अमोल खताळ यांनी लक्ष देऊन बस सुरू करावी अशी मागणी कुदनर यांनी केली आहे.
यावेळी शिवसेनेचे शिंदोडी गावचे ज्येष्ठ नेते पाटील भाऊ सटवाजी कुदनर, युवा नेते भागवत शेठ कुदनर, विठ्ठल शेठ नाईकवाडी, निखिल नाईकवाडी, अमोल नाईकवाडी यांची यावेळी उपस्थिती होती.
(प्रतिनिधी – रमजान शेख, साकुर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *