डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले नवरात्र ज्योतीचे स्वागत

नवरात्र उत्सव हा श्रद्धा भक्ती आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक – डॉ. थोरात

नवरात्र उत्सवाला भारतीय संस्कृतीमध्ये मोठे स्थान आहे. महिला सशक्तिकरण आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा हा उत्सव श्रद्धा भक्ती आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात यांनी म्हटले असून सप्तशृंगी गड वणी येथून आलेल्या ज्योतीचे स्वागत त्यांनी केले.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे एकलव्य भिल्ल समाज संघटना समनापुर यांच्या वतीने धावतीज्योत स्वागत प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी समवेत डॉ नितीन भांड, रामदास तांबडे, मंडळाचे गोकुळ गडगे, सुरज माळी ,दीपक बर्डे, शांताराम पवार, सुनील पवार, प्रकाश पिंपळे ,सुनील बर्डे, शुभम शर्माळे ,भूषण मोरे, मनोज खैरे, विनोद खैरे, शुभम पवार ,नवनाथ पिंपळे ,बाळा पवार ,भैया माळी, ऋतिक पवार, ओंकार जाधव, छोटू शेठ, सोनू माळी, विजय मोरे, जानराव पाटील प्रवीण माळी आदी उपस्थित होते.

ढोलताशांच्या गजरात आणि मोठ्या आनंदोत्सवात सप्तशृंगी गड येथून समनापुर येथील युवकांनी ही धावती ज्योत संगमनेर मध्ये आणली यावेळी डॉ जयश्रीताई थोरात यांनी या ज्योतीचे स्वागत केले. यावेळी डॉ.थोरात म्हणाल्या की, श्रावण मासा पासून सणासुदीचा काळ सुरू होतो. प्रत्येक सणाचे एक महत्त्व आहे. एकमेकांच्या सणात सहभागी झाल्याने आनंद द्विगुणित होतो. नवरात्र उत्सव हा नारीशक्तीचा सन्मान करणार आहे. समाजाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान असून महिलांना देवीचे रूप मानून तिची पूजा केली जात आहे. महिलेमध्ये सहनशक्ती मोठी आहे मात्र ज्यावेळेस अन्यायाची पराकाष्टा होते त्यावेळेस ती रणचंडी होते ही भारतीय संस्कृती आपल्याला सांगते. या संस्कृतीचा आपल्या सर्वांना मोठा आदर आहे.

महिलांचा आनंद असणारा हा सण संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे. विविध ठिकाणी विविध पूजा अर्चा होते. तरुणी गरबा डान्स मध्ये सहभागी होतात. आनंदाचा काळ आहे. आनंदाचे पर्व सर्वांनी एकत्र येऊन साजरे करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खराडी, मनोली येथील तरुणांनी ही धावतीजोत सप्तशृंगी गडावरून आणली या ज्योतीचेही स्वागत डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *