- गणेश उत्सवाच्या आनंद पर्वातून समतेची भावना वाढीस – लोकनेते मंत्री बाळासाहेब थोरात
- देखावे पाहण्यासाठी शहर गजबजले
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या संगमनेर शहरात पौराणिक, ऐतिहासिक व विविध आकर्षक देखाव्यांसह गणेश मंडळांनी मोठे आरस केले आहे. हे आरस पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शहर व ग्रामीण भागात विविध गणेश मंडळाच्या आरतींना भेट दिली याचबरोबर या गणेशोत्सवाच्या आनंदपर्वातून समतेची भावना वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.




संगमनेर शहरात राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विविध ठिकाणी गणेश मंडळांची आरती झाली. तसेच अनेक देखावे नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. यावेळी समवेत मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, दिलीपराव पुंड,विश्वासराव मुर्तडक,सोमेश्वर दिवटे,निखिल पापडेजा, आदींसह संगमनेर शहरातील अनेक महिला पदाधिकारी युवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. धरणे भरली आहेत. परंतु अजूनही ज्या भागांमध्ये पाऊस नाही त्या भागामध्ये पाऊस व्हावा. गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून हा उत्सव आता देशाचा झाला आहे. याचबरोबर बाहेरील देशांमध्ये मोठ्या आनंदाने हा उत्सव आता साजरा होतो आहे. संगमनेर मध्ये सर्वजण एकत्र येऊन दहा दिवस आनंद साजरा करतात. सर्वांनी एकत्र येऊन समतेची भावना वाढीस लागावी. प्रत्येकाने एकमेकांच्या सु:ख दुःखात सहभागी व्हावे. असा या सणाचा उद्देश आहे.
यावर्षी संगमनेर शहरांमध्ये विविध गणेश मंडळांनी देखावे अत्यंत सुंदर केले आहे. विद्युत रोषणाईसह सुंदर आरस असलेले देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करताना गणेश मंडळातील तरुणांनी नागरिकांच्या आरोग्याला हानी होणार नाही याकरता ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण न करता आरोग्यवर्धक गणेशोत्सव साजरा करावा. तसेच गणेश विसर्जन करताना तरुणांनी अतिउत्साह न दाखवता दुर्घटना टाळण्यासाठी संयम बाळगावा. पर्यावरण पूरक व स्वच्छतेचा संदेश देणारा या वर्षीचा गणेश उत्सव ठरावा असेही ते म्हणाले.




तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, गणेश उत्सव काळामध्ये तरुणांचा मोठा उत्साह असतो. संगमनेरकर सर्व एकरूप होऊन हा गणेशोत्सव साजरा करत आहेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम संगमनेर मध्ये होत आहेत. एकतेची सुरक्षिततेची व समृद्धीची ही परंपरा आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक तरुणाने सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे असे आवाहन केले.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, गणेश विसर्जनासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने 400 स्वयंसेवक निर्माल्य संकलन व विसर्जनासाठी सर्व नागरिकांना मदत करणार आहेत. तरुणांनी नदीकाठी विसर्जन करताना अतिउत्साह व पाण्यात जाऊन सेल्फी साठी जास्त धाडस करू नये असे आवाहन केले.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत सेल्फीसाठी तरुणाईची गर्दी
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सूसंस्कृत नेते असून राज्यभर तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. संगमनेर मधील तरुणांसाठी ते आयकॉन असून प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या समवेत सेल्फी व फोटो घेण्यासाठी तरुणांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली.



