लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 3.5 कोटींचा निधी मंजूर – आमदार सत्यजीत तांबे

  • विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणाबरोबर क वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास : आ. सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा एक परिवार म्हणून सततच्या विकास कामातून ग्रामीण विकासाचे मॉडेल बनवला आहे. ही परंपरा कायम पुढे राखत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावांमधील रस्ते, क वर्ग तीर्थक्षेत्रातील सुशोभीकरणाचे कामे यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग जन सुविधा, क वर्ग तीर्थक्षेत्र विकास व नागरी सुविधा योजनेअंतर्गत 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

तालुक्यातील विविध विकास कामांच्या बाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, संगमनेर तालुका विस्ताराने मोठा आहे 171 गावे व 258 वाड्यावर त्या असा मोठा विस्तारलेल्या तालुका असून विविध गावांमध्ये सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. आर्थिक वर्ष 2025 26 या अंतर्गत नागरी सुविधा विशेष अनुदान योजनेतून साकुर गावांतर्गत देवी पठार रस्ते कामासाठी 15 लाख रुपये, जवळेकडलग गावांतर्गत रस्ते 15 लाख रुपये, राजापूर ते चावरमाळा  रस्ता 10 लाख रुपये ,वेल्हाळे गावांतर्गत चिंचेचा मळा रस्ता 10 लाख रुपये, शिबलापूर सह्याद्री इंटरनॅशनल रस्ता 10 लाख रुपये, कासारा दुमाला गावांतर्गत रस्ता करण्यासाठी 10 लाख रुपये,

तळेगाव दिघे बोडके वस्ती रस्ता कामासाठी 15 लाख रुपये समनापुर गावांतर्गत बोळवट रस्ता 10 लाख रुपये, सुकेवाडी गावांतर्गत रस्ते 20 लाख रुपये, चंद्नापुरी गावांतर्गत रस्ता 7 लाख रुपये , चंद्नापुरी जांभळीचा मळा रस्त्याकरता 8 लाख रुपये गुंजाळवाडी गावांतर्गत म्हसोबा मंदिर रस्ता 10 लाख रुपये, गुंजाळवाडी सागर हाउसिंग सोसायटी रस्ता 20 लाख रुपये. असे एकूण 1 कोटी 50 लाख रुपये तर क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत कासारा दुमाला येथील हरि पुरुषोत्तम मंदिर येथील स्नानगृह व स्वच्छतागृहासाठी 10 लाख रुपये, अमृतेश्वर देवस्थान ट्रस्ट संगमनेर खुर्द येथील परिसराच्या सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये, खांजापूर अग्नेश्वर मंदिर देवस्थान सुशोभीकरण 10 लाख रुपये सायखिंडी खानेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण 10 लाख रुपये पारेगाव बुद्रुक रेणुका माता देवस्थान सुशोभीकरण 10 लाख रुपये असे एकूण 50 लाख रुपये. तसेच जन सुविधा विशेष अनुदानातून ढोलेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 15 लाख रुपये

शेंडेवाडी येथील स्मशानभूमी विकास कामांसाठी 5 लाख रुपये, हिवरगाव पठार स्मशानभूमी विकास कामासाठी 5 लाख रुपये, जांबुत खुर्द येथील गावांतर्गत वाडी वस्ती रस्त्या करतात 10 लाख रुपये, कवठे मलकापूर येथील काळे वस्ती रस्ता करण्यासाठी 10 लाख रुपये, दरेवाडी स्मशानभूमी विकास कामासाठी 7 लाख रुपये, वेल्हाळे येथील स्मशानभूमी विकासासाठी 7 लाख रुपये, राजापूर येथील स्मशानभूमी विकासासाठी 10 लाख रुपये, खांडगाव येथील गणेशवाडी रस्त्याकरता 7 लाख रुपये, संगमनेर खुर्द स्मशानभूमी विकास कामासाठी 10 लाख रुपये, निमगाव टेंभी येथील स्मशानभूमी विकासासाठी 5 लाख रुपये. सायखिंडी बोहरी समाज स्मशानभूमी 10 लाख रुपये, विकास कामासाठी 7 लाख रुपये, तळेगाव दिघे भागवत वाडी येथील स्मशानभूमी विकास कामासाठी 7 लाख रुपये, माळेगाव हवेली येथील मुस्लिम समाज स्मशानभूमी विकास कामासाठी 5 लाख रुपये आणि मंगळापुर येथील महानुभव दफनभूमी संरक्षण भिंत बांधण्याकरता 5 लाख रुपये असे 1 कोटी एकूण 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांची विकास कामे स्मशानभूमी विकास कामे, मंदिर परिसर अशा एकूण कामासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी अहिल्यानगर ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद योजनेतून मंजूर झाला आहे.

या निधीमधून विविध गावांमध्ये रस्त्यांच्या सुशोभीकरणासह मंदिर परिसराचे सुशोभीकरण होणार असल्याने तालुक्यातील या गावांमधून लोकनेते मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याबद्दल अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *