भाजीविक्रेत्यांचा आडमुठेपणा, नगरपालिका अतिक्रमणा विरोधात सक्त कारवाई करणार

बीएड कॉलेज परिसरने घेतला मोकळा श्वास  

शहरात वाढलेल्या अतिक्रमण विरोधात नगरपालिकेने तीन महिन्यांपूर्वी  मोहीम घेतली असून रस्त्यावरील टपरीधारक व फुटपाथवर विक्री करणाऱ्या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली असतानाही फुटपाथवर  बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी आडमुठे धोरण स्वीकारल्याने नगरपालिकेने अतिक्रमणाची कारवाई केली असून बीएड कॉलेज परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. अनियमित कामाविरोधात नगरपालिका सक्त धोरण अवलंबणार असल्याचे नगरपालिकेच्यावतीने सांगितले आहे.

पेटीट विद्यालयासमोर भाजीविक्रेते रस्त्यावर व फुटपात वर बसत असून जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठी अडचण तयार होते. याचबरोबर ही भाजी विक्रेते दांडगाही करत आहे . त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. पश्चिम भागातील नागरिकांच्या मागणीवरूनच फुटपाथ वरबसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर नगरपालिकेने तीन महिन्यापूर्वी अतिक्रमण मोहीम हटावण्या अंतर्गत कारवाई केली होती. या सर्व भाजी विक्रेत्यांच्या मागणीवरून या सर्वांना तात्पुरती पर्यायी जागा म्हणून मेडिकवर हॉस्पिटल समोर मार्केट उभे करून देण्यात आले.

ऊन, वारा, पाऊस या सर्वांपासून या भाजी विक्रेत्यांचे संरक्षण व्हावे म्हणून शेड करून देण्यात आले आणि त्या सर्वांना सदर जागेमध्ये शिफ्ट होण्यामध्ये सांगण्यात आले. याबाबत या सर्वांना तीन दिवसापूर्वी नोटीसही देण्यात आली होती. मात्र सर्व भाजी विक्रेत्यांनी अत्यंत आडमुठेपणा धोरण घेतल्याने नगरपालिकेने आज त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला.

नगरपालिकेने सर्वांची पर्यायी व्यवस्था करून दिल्यानंतरही या भाजीविक्रेत्यांनी आडमुठे धोरण स्वीकारल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रस्ता व फुटपात मोकळा झाल्याने रहदारी सोयीची होणार आहे. फुटपाथ वर झालेल्या अतिक्रमणामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे . नागरिकांच्या सोयीसाठी ही कारवाई असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले असून शिस्त लावण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *