फ्लेक्स मुक्तीमुळे बसस्थानकासह महत्त्वाच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

  • लोकनेते बाळासाहेब थोरात व आ.सत्यजीत तांबे यांच्या सूचनेचे पालन
  • फ्लेक्स मुक्तीमुळे बसस्थानकासह महत्त्वाच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
  • दैदीप्यमान यशानंतरही सेवा समितीकडून फ्लेक्स बाजी नाही
  • संगमनेरात फ्लेक्सबाज पुढाऱ्यांना चपराक

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून आणि ऐतिहासिक योजना राबवून संगमनेर शहर हे राज्यात अग्रगण्य बनवले. हायटेक बस स्थानक ही शहराची मोठी ओळख असून या परिसरामध्ये मागील एक वर्षांमध्ये फ्लेक्समुळे विद्रूपीकरण झाले होते. मात्र आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या शब्दातून निवडणुकीनंतर मिळालेल्या मोठ्या यशा नंतरही फ्लेक्स बंदी कायम ठेवण्यात आली असून यामुळे बस स्थानकासह मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे व 27 नगरसेवकांना संगमनेर शहरातील जनतेने मोठ्या मताधिक्याने विजयी केले. हा विजय महाराष्ट्रातील अव्वल विजय ठरला. 16644 मतांनी नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे विजयी झाल्या. हा विजय जनतेचा विजय असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

तर निवडणूक प्रचार कालावधीमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर शहरात फ्लेक्स च्या माध्यमातून होणारे विद्रूपीकरण थांबवले जाईल असे सूचित केले होते. याचबरोबर दिवाळीच्या पूर्वी त्यांनी स्वतःचे फ्लेक्स स्वतःकाढून घेतले होते. मात्र ज्यांचे समाजकार्यामध्ये कोणतेही योगदान नाही अशा फ्लेक्स बाज पुढार्‍यांनी फ्लेक्सची चढावड करून संगमनेर शहरात मोठे विद्रूपीकरण केले होते.

याबाबत संगमनेर मधील अनेक समाजसेवी संघटना, बस स्थानकावरील गाळेधारक, युवक संघटना यांनीही वेळोवेळी आंदोलने केली मात्र सत्ताधाऱ्यांनी दमदाटी करून फ्लेक्स तसेच ठेवले. याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी असलेल्या ना.बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या कमानीवर मुद्दाम कमाल लावली होती आणि ही संगमनेर शहरवासीयांना अजिबात रुचलेले नव्हते.

कोणतेही विकास काम न करता फक्त फ्लेक्स बाजी करणे किंवा कोणत्याही समाजकार्यात योगदान न देता सामाजिक कार्यकर्ता म्हणून फ्लेक्स लावणे हा मोठा उद्योग संगमनेर मध्ये सुरू झालेला आहे यावर आमदार सत्यजित तांबे यांनी अनधिकृत कोणाचाही फ्लेक्स लागणार नाही अशी सूचना प्रशासनाला केली. यामुळे अशा फ्लेक्स बाज पुढार्‍यांना मोठी चपराक मिळाली आहे.

त्यानंतर इतक्या मोठ्या यशानंतरही सेवा समितीने आपले पहिले वचन पूर्ण केले असून कुठेही फ्लेक्स बाजी केली नाही. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अनेक दिवसांनी संगमनेर बस स्थानकासह मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. या अभिनव उपक्रमाचे सर्व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार तांबे यांनी स्वतः हटवले होते स्वतःचे फ्लेक्स.

विकास कामे करताना सर्वांना सोबत घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहर व तालुका राज्यात अग्रगण्य बनवला. राज्याचे महसूल मंत्री प्रदेशाध्यक्ष व गटनेते असताना अनेक कार्यकर्त्यांनी लावलेले फ्लेक्स लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतः काढले होते. हाच आदर्श घेऊन आमदार सत्यजित तांबे यांनी सुद्धा स्वतःचे फ्लेक्स स्वतः काढले. मात्र सत्ता पक्षातील काही लोकांनी नको तेथे फ्लेक्स लावून संगमनेर करांच्या भावना दुखावल्या.

फ्लेक्सबाज पुढाऱ्यांना चपराक

मागील एक वर्षापासून संगमनेर शहर व तालुक्यामध्ये काम न करता फ्लेक्स बाजी सुरू आहे. संस्कृत संगमनेरकरांना हे मान्य नाही. सेवा समितीच्या मोठ्या घवघवीत यशानंतर फ्लेक्सबाज पुढाऱ्यांना मोठी चपराक बसली असल्याचे संगमनेर मधील अनिकेत घुले व रमेश गफले यांच्यासह विविध युवक आणि नागरिकांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *