2025 मध्ये संगमनेरकरांनी काय कमावले, काय गमावले

लोकनेते बाळासाहेब थोरात विकासासाठी कटिबद्ध तर नवीन लोकप्रतिनिधीचे नेतृत्व अपयशी

सहा महिने पाऊस हे 2025 चे मोठे वैशिष्ट्य राहिले असून महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यशैलीप्रमाणे सातत्याने विकासासाठी काम केले तर संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी हे फ्लेक्सबाजी मध्ये दंग राहून नेतृत्व करण्यात अपयशी ठरले. थोरात सहकारी साखर कारखान्याची बिनविरोध निवडणूक याचबरोबर नगरपालिकेमध्ये सेवा समितीला घवघवीत यश हे संगमनेरकरांनी सुसंस्कृत राजकारणाला दिलेले मोठे पाठबळ असून मागील वर्षात संगमनेर मध्ये वाढलेली अमली पदार्थांची तस्करी हा मोठा चिंतेचा विषय ठरला.

संगमनेर तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून कृषी, सहकार, दूध व्यवसाय, समृद्ध बाजारपेठ, सुसंस्कृत वातावरण, शैक्षणिक सुविधा यामुळे संगमनेर शहर व तालुका राज्यामध्ये अग्रगण्य ओळखला जातो. 2025 मध्ये चांगल्या पावसाबरोबर जानेवारीपासूनच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली साहित्य, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक विभाग, क्रीडा यामध्ये संगमनेरने आपले वैभव कायम ठेवले.

आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली सहकारमहर्षी T20 क्रिकेट स्पर्धा अत्यंत लोकप्रिय ठरली तर पारितोषिक वितरणासाठी कसोटी पटू अजिंक्य रहाणे यांची उपस्थिती संगमनेर करांसाठी संस्मरणीय राहिली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सवानिमित्त खासदार शाहू महाराज, आ.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे डॉ.रावसाहेब कसबे यांना सन्मानित करण्यात आले. तर अमृतवाहिनीच्या मेधा महोत्सवामध्ये शरद तांदळे यांचा संवाद आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक अमाल मलिक याचा लाईव्ह कॉन्सर्ट लक्षवेधी ठरला. संगमनेरच्या विकासाची कामधेनु असणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली.

तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांच्या हस्ते सांगली येथे सहकारतीर्थ पुरस्काराने गौरवण्यात आले. याचबरोबर आमदार सत्यजित तांबे यांना पुणे येथे आदर्श युवा आमदाराने गौरविण्यात आले. तर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार मिळाला.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला ऑटोनॉमस चा दर्जा मिळाला तर थोरात कृषी महाविद्यालयाने कृषी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. आश्वीच्या पुनम खेमनर हिने मुंबईच्या आयपीएल संघामध्ये प्रवेश मिळवला तर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटपटूंनी संगमनेर मध्ये येऊन स्थानिक महिला खेळाडूंची प्रदर्शनीय सामना खेळला.

डॉ.जयश्रीताई थोरात यांनी युवक काँग्रेस व एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणासह युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले. अद्यावत अभ्यासिका निर्माण करण्याबरोबर शिक्षण व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान केला याचबरोबर तालुक्यातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत राहून एक परिवार एक तालुका ही परंपरा जपली.

तर मा.आमदार डॉ सुधीर तांबे व सौ.दुर्गाताई तांबे यांनी दंडकारण्य अभियान ही पर्यावरण चळवळ राबवली.

तालुक्यात दिवाळी सह विविध सण आनंदाने साजरी झाली. मात्र काही वादग्रस्त गोष्टीमुळे संगमनेरकर चिंतावले. भंडारे महाराज यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. या विरोधात संगमनेरकर एकवटले तर संगमनेर मध्ये कधीही नसणारी अमली पदार्थांची तस्करी, ड्रग्स,सिगारेट, गांजा, हप्ते खोरी,चोऱ्या, यामुळे चिंतेचे वातावरण झाले.

नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांना नागरिकांनी भरभरून मतदान केले. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने 27 नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले याउलट विखे,खताळ जोडीला फक्त 1 जागा मिळाली. तर डॉ.मैथिलीताई तांबे राज्यातून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या.

तर संगमनेरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी नाशिक पुणे रेल्वे ही शिर्डी मार्गे वळवली गेलेले संगमनेर तालुका या विरोधात एकवटला.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचा करिष्मा, नवीन लोकप्रतिनिधीचे नेतृत्व अपयशी

संस्कृत राजकारणाची परंपरा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेत तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने काम केले. नवीन लोकप्रतिनिधी यांनी कोणतेही काम न करता फक्त फ्लेक्स बाजी केली आणि ती सामान्य नागरिकांना रुचली नाही. एक वर्षात एकही काम न करता फ्लेक्स बाजी करणाऱ्यांना जनतेने नाकारल्याने नवीन लोकप्रतिनिधीचे नेतृत्व अपयशी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *