संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी रेल्वे बाबत स्टंटबाजी न करता पाठपुरावा करावा

  • सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेऊन जनतेचा आवाज बुलंद करावा
  • संगमनेर रेल्वे कृती समितीची मागणी
  • संगमनेर मध्ये एक वर्षात अमली पदार्थ आले आणि रेल्वे पळावली
  • होर्डिंग उभारून जनआंदोलनात सहभागी होण्याची आवाहन

संगमनेर अकोले परिसराच्या औद्योगिक आणि व्यापार वृद्धी बरोबरच तरुणांच्या नोकरी व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नाशिक – पुणे रेल्वे साठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला मात्र विद्यमान सत्ताधारी यांनी शिर्डी मार्गे ही रेल्वे नेली असून याला विरोध करणे गरजेचे आहे. याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी मोठी जन चळवळ उभारली असून यामध्ये संगमनेरचे लोकप्रतिनिधी यांनी सहभाग घ्यावा फक्त फोटोसाठी स्टंटबाजी करू नये असे आवाहन रेल्वे कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. संगमनेर शहर व पुणे पर्यंत संगमनेर रेल्वे मार्गाचे होर्डिंग उभारण्यात आले असून हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

संगमनेर रेल्वे कृती समितीच्या वतीने नाशिक ते पुणे महामार्गावर रेल्वे महामार्गाचे होर्डिंग उभारण्यात आले असून यामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेरच्या नवीन लोकप्रतिनिधींनी नागपूर अधिवेशनामध्ये हातात फलक घेऊन स्टंटबाजी केली खरे तर त्यांनी संगमनेरच्या रेल्वेसाठी जनआंदोलनात सहभागी झाले पाहिजे. आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक – पुणे रेल्वे साठी मोठी लोक चळवळ उभारली. ऑनलाइन कॅम्पियन बरोबर सह्यांची मोहीम संगमनेर मध्ये सुरू झाली आहे. यामध्ये सर्वपक्षीय नागरिक सहभागी आहेत याचबरोबर सिन्नर,संगमनेर,नारायणगाव, खेड,मंचर यांचे सर्व लोकप्रतिनिधी व नागरिक सुद्धा सहभागी आहेत.

संगमनेरच्या दळणवळण आणि व्यापार वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली रेल्वे ही विद्यमान सत्ताधारी मुख्यमंत्री,पालकमंत्री यांनी शिर्डी मार्गे वळवली याला संगमनेरच्या लोकप्रतिनिधीने विरोध केला पाहिजे किंबहुना राजीनामा देण्याची तयारी दाखवली पाहिजे. मात्र असे न करता फक्त फोटोसाठी स्टंटबाजी आणि काम न करता फ्लेक्स बाजी हे त्यांची वैशिष्ट्य असून आंदोलनामध्ये सहभागी व्हा मुख्यमंत्र्यांसमोर आवाज उठवा. उपोषणाला बसा राजीनामा द्या असे काहीतरी करा फक्त फोटोसाठी फ्लेक्स बाजी करू नका असे आवाहन संगमनेर रेल्वे कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संगमनेरचे लोकप्रतिनिधी काम न करता स्टंटबाजी आणि विकास न करता फ्लेक्स बाजी करतात

मागील एक वर्षांमध्ये संगमनेर शहर व तालुक्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी वाढली. ड्रग्स एमडी मेडिसिन याचबरोबर अवैध धंदे वाढले. एक वर्षांमध्ये अमली पदार्थ शहरात आले मात्र विकासाची रेल्वे बाहेर गेली याला जबाबदार कोण याचे उत्तर नवीन लोकप्रतिनिधींनी दिले पाहिजे अशी भावना युवक कार्यकर्ते प्रवीण गुंजाळ, प्रवीण पानसरे, सचिन दिघे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *