कवी अनंत फंदी नाट्यगृह कामासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही – ना. सामंत

कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाची आमदार अमोल खताळ यांच्या आग्रहास्तव मंत्री सामंत यांनी केली पाहणी

संगमनेर शहरातील कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लागावे यासाठी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आमदार अमोल खताळ यांच्या आग्रहास्तव या नाट्यगृहाची पाहणी करून या खुल्या नाट्यगृहाच्या कामा साठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही असे आश्वासन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले

राज्याचे उद्योग व सांस्कृतिक मंत्री उदय सामंत हे संगमनेर येथे तमाशा कलावंत पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या आग्रहास्तव त्यांनी शहरातील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाला भेट देऊन अपूर्ण राहिलेल्या बांधकामाची पाहणी केली.या वेळी आमदार अमोल खताळ यांनी मंत्री सामंत यांना सांगितले की, “या खुल्या नाट्यगृहाचे काम अनेक वर्षांपासून थांबलेले असून, शहरातील नाट्यप्रेमी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.”त्यावर मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या नाट्यगृहाच्या अपूर्ण बांधकामासाठी भरीव स्वरूपाचा निधी मंजूर करून दिला जाईल,” असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.यावेळी संगमनेर नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य संजय कुमार दळवी,अमित शिंदे ,अतनू घोडके ,मोहसीन शेख ,विशाल कदम राजू अत्तार, संगमनेर शहरातील नाट्य प्रेमी नागरिक, महायुतीचे कार्यकर्ते व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *