संपूर्ण देशाला दिशा देणाऱ्या संगमनेरच्या सहकाराने शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब नागरिक यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. गाव पातळी पासून असलेल्या प्राथमिक संस्थांसह हा सहकार अधिक सक्षम करण्याबरोबर टिकवण्यासाठी सहकारातील कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहावे असे आवाहन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून सहकारातील सर्व कार्यकर्त्यांनी सहकाराची प्रतिज्ञा घेतली.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने प्राथमिक सेवा सोसायटी सक्षमीकरण व सहकारातून समृद्धी या कार्यशाळेत या सर्व कार्यकर्त्यांनी शपथ घेतली यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख ॲड माधवराव कानवडे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, लक्ष्मणराव कुटे, आर.बी राहणे, पांडुरंग पाटील घुले, संपतराव डोंगरे ,रामहरी कातोरे ,संचालक विलासराव वर्पे ,भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुराडे ,बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम राजे थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर ,रवींद्र रोहम, भारत मुंगसे ,गोरख नवले, के के थोरात ,कार्यकारी संचालक डॉ. सुजित आधी उपस्थित होते या सर्वांना सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक ॲड अनिल भांगरे यांनी शपथ दिली.
यावेळी मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की दूध हा मोठा कष्टाचा व्यवसाय आहे. तालुक्यामध्ये समृद्धी निर्माण करण्यामध्ये दूध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. सहकारी दूध संस्थांमुळे खाजगी दूध संस्था वचक असल्याचे ते म्हणाले.
तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की कोरोना काळात जग बंद असताना दूध व्यवसायाचे सर्व घटक अविरतपणे काम करत होते .या व्यवसायात अनेक समस्या व प्रश्न असले तरी कष्टातून समाधान देणारा हा व्यवसाय आहे .सहकारात शेतकऱ्यांचे हित कायम जपले जात असून आपल्या सर्वांना सहकार टिकवायचा असून वाढवायचा आहे.
दूध उत्पादकांनी गोठा मिल्किंग मशीन, स्वच्छ ठेवण्याबरोबर गाईंचे आरोग्य जपले पाहिजे. तर प्राथमिक सेवा सोसायटी यांनी बल्क बिल कुलर स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे .याचबरोबर दोन वेळेस दुधाचा पुरवठा केला पाहिजे. कमी काही संख्येमध्ये जास्त दूध उत्पादकता वाढवण्यासाठी काम होणे गरजेचे आहे , मुरघास व मुक्त संचार गोठा या संकल्पना आपल्या तालुक्यात चांगल्या राबवल्या गेल्या असून दूध संघाने कायम दूधफरकासह चांगला भाव दिला आहे.
यावेळी प्राथमिक संस्था यासाठी सहकारी संस्थांचे कायदे नियम व गाई त्यांचे आरोग्य निगा आहार याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले.
प्राथमिक सहकारी संस्थांनी दोन वेळा संकलन करू दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न करा
राजहंस दूध संघाने कायम गुणवत्ता राखली असून राज्यभरात स्वच्छ व गुणवत्तेचे दूध म्हणून आपला लौकिक आहे. तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांनी दोन वेळा दूध हे आपल्या प्राथमिक संस्थेत पाठवणे गरजेचे असून प्रत्येक संस्थांनी आपल्या पातळीवर दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन रणजीत सिंह देशमुख यांनी केले.



