- मतदार याद्या दुरुस्त करा, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या.
- संगमनेर मतदारसंघात 9500 बोगस मतदार–काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
- लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र एकवटला……
मुंबईमध्ये होत असलेला हा भूतपूर्व मोर्चा केवळ निवडणूक आयोगावर नाही तर त्यांना चालवणाऱ्या सत्तांवर आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठा घोळ होता. संगमनेर मतदार संघात 9500 बोगस मतदार आहेत. पहिल्या मतदार याद्या दुरुस्त करा, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सत्याच्या मोर्चात केली आहे.

मुंबई येथे महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात भव्य सत्याचा मोर्चा करण्यात आला यावेळी ते विराट मोर्चात बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, बंटी पाटील, भाई जगताप, किसान सभेचे ॲड अजित नवले यांच्यासह राज्यभरातील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
यावेळी या विराट मोर्चा काँग्रेस पक्षाच्या वतीने बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी निवडणुका वोट चोरी मधून होत असल्याचे दाखवून दिले. विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना निवडणूक आयोगाने अत्यंत थातूरमातूर उत्तरे दिली आहेत .इतिहासातील सगळ्यात बोगस ठरणारी अशी उत्तरे त्यांनी दिली आहेत. निवडणूक आयोगाने कोणताही खुलासा केला नाही. चौकशी केली नाही. समाधानकारक उत्तरे ते देऊ शकले नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या बोगस मतदार याद्यांवर झाल्या. आम्ही यावर हरकती घेतल्या . आम्ही मागणी केली आहे की, विधानसभेला वापरलेल्या निवडणूक याद्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये वापरू नका.
या याद्यांच्या हरकतींवर कोणताही निर्णय न घेता त्यांनी एक जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाला ह्या याद्या दिल्या आहेत. आम्ही दोन वेळेस राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो .समाधानकारक उत्तरे आम्हाला मिळाली नाही .अनेक उदाहरणे आम्ही सांगितली त्यावर कार्यवाही नाही.
माझ्या संगमनेर मतदार संघामध्ये ग्रामीण भागात 9500 बोगस मतदार नोंदणी आहे. त्यामध्ये शहराची नाही शहरात 60000 मतदार आहेत. आम्ही हरकती घेतल्या. या मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे. तेथे तहसीलदाराने आम्हाला सांगितले की आम्हाला हा दुरुस्तीचा अधिकार नाही असे लेखी उत्तर दिले. विधानसभेची बोगस मतदार यादी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरली जाईल.
निवडणूक आयोगाने पत्र काढले दुरुस्त्या कराव्यात त्या अगोदर नगरपालिकेच्या याद्या जाहीर करण्यात आले आहेत मागच्या विधानसभेच्या मतदार यादी प्रचंड घोळ आहे बोगस मते नोंदविण्यात आली आहे पहिली मतदार यादी दुरुस्त झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मतदार याद्या दुरुस्त करा आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्याच्या विराट मोर्चात केली.
सत्ताधाऱ्यांच्या मूक मोर्चावर टीका
आजचा विराट मोर्चा हा लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी आहे. निवडणूक आयोगाने मत चोरी विरोधात आहे. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा मूक मोर्चा काढला आहे त्यामध्ये निवडणूक आयोग सहभागी झाला की काय हे पाहण्याची वेळ आहे. असे चित्र निर्माण झाले असून या मूक मोर्चावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली.


