लोकनेते बाळासाहेब थोरात यांची हातावर कोरली छबी

डॉ. विजय पवार युवा कार्यकर्त्याची लोकनेत्याप्रती एकनिष्ठता

महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या हृदयात असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांची छबी आपल्या उजव्या हातावर कोरून युवा कार्यकर्ते व शिवराणा कुटुंब फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी सध्याच्या अस्थिर राजकारणाच्या पार्श्वभूमीवर युवकांमधील एकनिष्ठता दर्शवली आहे.

यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्रात ओळख आहे. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ सैनिक असलेल्या लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रति तरुणांमध्ये मोठा आदर आहे. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व शिवराणा कुटुंब फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ विजय पवार यांनी लोकनेते थोरात यांची छबी आपल्या हातावर करून तरुणांमुळे एकनिष्ठतेचा नवा अध्याय दिला आहे.

डॉ.विजय पवार हे शिवराणा कुटुंब फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य व सामाजिक काम करत असून कोरोना संकट काळामध्ये त्यांनी गोरगरिबांना अत्यंत मोठी मदत केली आहे .याचबरोबर डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांचे मोठे संघटन करून गावोगावी सातत्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिर हा महत्त्वाचा उपक्रम त्यांनी हाती घेऊन युवकांना रक्तदानासाठी कायम प्रेरित केले आहे. सामाजिक कार्याबरोबर आरोग्य सेवा देणाऱ्या या आरोग्य सेवकाने कायम तरुणांमध्ये सकारात्मक वृत्ती वाढीस लावण्याबरोबर युवकांना विविध करिअरच्या संधी उपलब्ध करून दिले आहे.

अत्यंत नम्रपणे सेवाभावी काम करणाऱ्या या निष्ठावंत सैनिकाचे विविध युवक संघटना व सामाजिक कार्यकर्ते, आणि शिवराणा कुटुंब फाउंडेशनने अभिनंदन केले आहे.

एकनिष्ठता ही ओळख

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज व फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे. सत्तेसाठी राजकारण किंवा समाजकारण करायचे नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकनेते बाळासाहेब थोरात आहेत. सत्ता येथे आणि जाते मात्र युवकांना आणि सर्वसामान्यांना उभे करणाऱ्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने पाठबळ देण्यासाठी तरुणांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. श्रद्धा आणि निष्ठा ही शब्दातून सांगून किंवा भाषणातून सांगण्याची गोष्ट नसून प्रत्येकाने कृतीतून करावी म्हणजे एकनिष्ठ व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या समाज निर्माण होईल असेही युवक कार्यकर्ते डॉ विजय पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *