संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या बदलीनंतरअवघ्या काही दिवसांमध्येच तीन मुख्याधिकारी बदलल्याची वृत्त काही दैनिकांमधून प्रसिद्ध झाले. मात्र कुठल्या ही प्रकारची शहानिशा न करता अफवा पसरविण्यात आली असून, हे निराधार वृत्त यशोधन कार्यालयातून आले आहे हे सांगण्याची कुणालाही गरज नाही हे सर्व सामान्य जनतेला ठाऊक आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत राज्यातील अनेक मुख्य आधिकाऱ्यांना बढती देण्यात आलीआहे, तब्बल ६५ मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्ती आदेशाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार संगमनेर नगरपालिकेचे तात्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची बढतीवर बदली झाली आहे त्यांच्या जागेवर मुख्याधिकारी म्हणून दयानंद गोरे ही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे . ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत, “ते पारदर्शक कारभाराचे पाठीराखे असून, ते आल्यानंतर नगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि दलालशाहीला निश्चितच लगाम बसणार आहे.
कोकरे गेल्यामुळे काहींचे मनसुबे उधळले असल्याने काही जणांचा जळफळाट होत आहे. यापूर्वी संगमनेर नगरपालिकेत टी टी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ब्रेक लागला असल्यामुळे त्यांना दुःख झाले आहे अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घरची कामे सांगता येत नाही म्हणून काहीजण चुकीच्या पद्धतीने निराधार व खोटेवृत्त पसरवून जनतेची अनेक वर्षात अशी दिशाभूल केली आहे तशीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे असले तरी सर्वसामान्य जनता आता त्यांना थारा देणार नाही पुन्हा एकदा संगमनेर नगरपालिकेवर भगवा फडकणार आहे नगरविकासमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून संगमनेर शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून शहराचा काया पालट करण्याचा आमदार अमोल खताळ यांनी केला आहे त्यामुळे त्यांनी कितीही आरोप प्रत्यारोप केला तरी मयताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांना काय कळणार त्यांचे अजून बरेच काही कारनामे आहे ते लवकरच जनतेसमोर आणले जातील अशी टीका फटांगरे यांनी केली.
पूर्वी अधिकाऱ्यांना राजकीय दबावा खाली काम करावे लागत होते, पण आता आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वा खाली प्रशासकीय अधिकारी कोणत्याही दबावाशिवाय, निर्भयपणे व पारदर्शकतेने काम करत आहेत. त्यामुळे संगमनेरमध्ये अधिकारी म्हणून कार्य करण्याची इच्छा अनेकांना होत आहे.” दरम्यान, माजी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या विरोधात अनेक तक्रारी शासन स्तरावर प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत शासनाने तात्काळ त्यांची बढतीवर त्यांची बदली केली. त्या नंतर शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची संगमनेर नगरपालिकेवर प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शिर्डी नगर पालिकेत आरक्षण सोडत असल्याने त्यांना दुहेरी जबाबदारी घेणे शक्य नव्हते. अकोले नगरपंचायतीच्या निवडणुका नसल्यामुळे अकोले नगरपंचायतच्या मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या पदोन्नतीनंतर त्यांच्या जागी अरुण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मध्यंतरी तहसीलदार धीरज मांजरे हे आजारपणामुळे रजेवर गेले होते त्यावेळी त्यांच्या जागेवर नायब तहसीलदार यांना प्रभारी तहसीलदार पदावर कार्यरत होते. तसेच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या बाबत जनतेच्या अनेक तक्रारी झाल्याने त्यांची बदली करून त्यांच्या जागेवर संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदावर प्रवीण साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता प्रशासकीय कामकाज सुरळीत पणे सुरू आहे परंतु हे काहींना सहन होत नाही त्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप करून संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे तरी जनता त्यांच्या कुठल्याही आरोपांना भीक घालणार नाही अशी टीका फटांगरे यांनी केली आहे.
पूर्वीच्या काळी तहसील कार्यालय प्रांत कार्यालय नगरपालिका पंचायत समिती या सर्व शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात दलाली राज सुरू होते परंतु तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर“ नगर पालिकेपासून तहसील कार्यालय,पंचायत समितीपर्यंत सर्वत्र दलालीराज संपुष्टात येत आहे. सरकारी कार्यालयांत सर्व सामान्य जनतेची अडवणूक न होता जलदगतीने कामे होत आहेत. याचे दुःख काहींना सहन होत नाही. यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करत असल्याची टीका शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी केली आहे.
संगमनेर मध्ये प्रशासकीय पारदर्शकता आणि कायदा सुव्यवस्था अतिशय उत्कृष्ट पणे राबवली जात आहे. अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांवरती कठोर कारवाई सुरू असून त्यामुळे अनेक वर्षे त्यांच्या जोपासलेल्या काही व्यक्तींचे हितसंबंध धोक्यात आले आहेत. त्यामुळेच ते विना कारण आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत. या तालुक्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा ठेकेदाराकडून चुकीचे काम होत नाही, तरीसुद्धा असे निराधार आरोप केले जात आहेत. या सर्व बाबी सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहेत. त्यामुळे तुम्ही किती ही आरोप केले तरी जनतेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळणार नाही, अशी टीका फटांगरे यांनी केली.



