सावरचोळ व शिरसगाव धुपे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश,आ. खताळ यांच्याकडून कार्यकर्त्यांचे स्वागत !

तालुक्याच्या पश्चिम भागातील सावरचोळ व धुपे येथील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह इतर कार्यकर्त्यांनी शिवसेने मध्ये प्रवेश केला आहे आमदार खताळ यांनी या कार्यकर्त्यांची महायुतीमध्ये स्वागत केले. सावरचोळ येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ तुकाराम बाबा कानवडे, भागवत कानवडे ,अविनाश कानवडे ,भाऊराव कानवडे व विशाल कानवडे शिरसगाव घुपे येथील भागवत चौधरी आणि यशवंत चौधरी यांच्यासह असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदार.अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करत महायुतीचा भगवा हातात घेतला आहे.


सावरचोळ येथील तुकारामबाबा कानवडे हे गेली १५ वर्षांपासून माजी सभापती स्व अशोक मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात काम करत होतो. मात्र त्यांचे निधन झाले त्यांनतर आम्हाला काँग्रेस पक्षात कुठला ही न्याय मिळाला नाही तसेच अनेकवेळा सांगून सुद्धा आमची कामे झाली नाहीत आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमा तून संगमनेर तालुक्यामध्ये विकास कामे वेगाने सुरू आहेत त्या विकास कामांना साथ देण्यासाठी तसेच आमच्या गावा तील गावातील विकासकामे मार्गी लागावे यासाठी आपण आमदार अमोल खताळ यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तुकारामबाबा कानवडे, भागवत कानवडे, अविनाश कानवडे, भाऊराव कानवडे, विशाल कानवडे, शिरसगाव घुपे येथील भागवत चौधरी व यशवंत चौधरी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ यांच्यासह सावरचोळचे सागर कानवडे भाऊसाहेब कानवडे ,गोविंद कानवडे पोपट चौधरी मंगेश भोजने भाऊसाहेब कानवडे आदी आदींसह दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना महायुतीमध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झाले आहे मी तुमचे स्वागत करतो. शिवसेना पक्षाची तालुक्यात खऱ्या अर्थाने ताकद वाढलेली आहे. त्यामुळे अनेकजण महायुतीकडे आकर्षित होत आहे. तुमच्या गावातील कुठलेही काम असो यासाठी माझे महायुती जनसंपर्क कार्यालय एकही दिवस सुट्टी न घेता चोवीस तास चालू असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमा तून तालुक्यामध्ये विकास कामे वेगाने सुरू आहे तुमच्या भागातील जी विकास कामे रखडलेली आहे ती सुद्धा आपण पूर्ण करू.
अमोल खताळ – आमदार, संगमनेर विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *