महायुती सरकारने आद्य क्रांतिकारकांच्या इतिहासाला उजाळा दिला – आमदार अमोल खताळ

  • राजे उमाजी नाईक यांची जयंती आमदार खताळ यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात

देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. मात्र त्या क्रांति कारकांचा इतिहास झाकण्याचा काँग्रेस सरकारने प्रयत्न केला हे फार मोठे दुर्दैव आहे. मात्र त्याला खऱ्या अर्थाने उजाळा देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्य मातून झाले असल्याचे परखड मत आ अमोल खताळ यांनी काढले.

जय मल्हार क्रांती या संघटनेच्यावतीने आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ जनसंपर्क कार्यालयापासून ढोल ताशाच्या गजरामध्ये बसस्थानकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर बस स्थानकावर आयोजित जयंती महोत्सव कार्यक्रमात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते या वेळी व्यासपीठावर श्रीरामपूरचे प्रखर हिंदुत्ववादी नेते सागर बेग जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष रोहिदास मदने नाशिक जिल्हाध्यक्ष मतेश जेडगुले शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोदसूर्यवंशी भाजपतालुका ध्यक्ष गुलाब भोसले शहरा ध्यक्ष पायल ताजणे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावशे भारत गवळी दिलीप रावळ अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कैलास जेडगुले जिल्हा सचिव भारत गोफणे दत्तू गोफने तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण युवक अध्यक्ष सागर जेडगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    आ.  खताळ म्हणाले की, आद्य क्रांति कारक राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लढा दिला त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.राजे उमाजी नाईकांनीफक्त रामोशी समाजबांधवांना न्याय दिला नाही तर  सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नकेला आहे. त्यामुळे रामोशी समाजबांधवांनी आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचा आदर्श घेऊन पुढं मार्गक्रमण करावे ज्या पद्धतीने  रामोशी समाज बांधवांनी एकत्रित येत गनिमी काव्याने ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष ळरत त्यांना सळो की पळो करून सोडले .तसाच गनिमी कावा या समाजबांधवांनी विधानसभा निवडणुकी मध्ये वापरत आम्ही कोणाच्या दबावाला व  दहशतीला घाबरणारे नाही हे दाखवून देत हा सर्व समाज महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला. गेली कित्येक वर्ष केंद्रात व राज्यात विशेषता संगमनेर मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. त्या वेळी फक्त ठराविक महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे संगमनेर मध्ये साजरे होत होते.मात्र या तालुक्यात परिवर्तन झाल्या नंतर सर्वच राष्ट्रमहापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्याचे भाग्य मला मिळालेआहे  प्रत्येक समाजघटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम आपण करत आहोत. तुम्ही माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही असाही विश्वास आमदार खताळ व्यक्त केला .जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रोहिदास मदने शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले तर आभार मच्छिंद्र गुळवे यांनी मानले हा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला पुरुष तरुण यांनी विशेष परिश्रम घेतले. 



कुठलेही पद नसताना रामोशी समाज बांधवांना न्याय मिळण्यासाठी दौलत शितोळे यांनी सर्व समाजाला एकत्र करून तात्कालीन सरकारच्या विरोधात संघर्ष करत आंदोलन मोर्चे केले ..मात्र आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारने या समाजाची दखल घेतली नाही मात्र राज्या मष्ये महायुती सरकार सत्तेवर आल्या नंतर खऱ्याअर्थाने या समाजाला मुख्य प्रवाहात आणून महाराष्ट्रात एक मानाचे स्थान देण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या माध्य मातून झाले आहे. त्यामुळे हेच महायुती सरकार एक ना एक दिवस दौलत शितोळे यांना विधानपरिषदेचा आमदार निश्चितच करतील यात शंका नाही.

रामोशी समाजाचा येथून मागे काहींनी फक्त मतासाठीच वापर केला गेला. मात्र तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन माझ्या पाठी मागे भक्कम उभे राहात परिवर्तन केले आहे त्यामुळे त्यांना आता महापुरुष आठवायला लागल त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते आता-५ ऑक्टोबरला ते राजे उमाजी नाईक यांची ५ ऑक्टोबरला जयंती साजरी करणार आहे असे समजले आहे याचा आम्हाला आनंद आहे.आम्ही सर्वच राष्ट्र महापुरुषां च्या जयंती उत्सव साजरे करू लागलो. त्यामुळेच खऱ्या अर्थाने त्यांना आता महा पुरुष आठवायला लागले असल्याचाटोला आमदार खताळ यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.

संगमनेर तालुक्यात परिवर्तन करण्यात रामोशी समाज बांधवांचा खूप मोलाचा वाटा आहे. रामोशी समाजावरती तुम्ही जो विश्वास राकला आहे त्याला हासमाज कधीही तडा जाऊ देणार नाही. महायुती सरकारच्या मागे रामोशी समाज कायम स्वरूपी भक्कम उभा राहणार आहे. जे खरे रामोशी आहे त्यांनी बाजूला न जाता आमदार अमोल खताळ यांच्याबरोबर या महायुती सरकारने या समाज बांधवांना न्याय दिलाअसल्यामुळे संपूर्ण राज्यातील रामोशी समाज महायुती बरोबर राहील.
दौलत शितोळे – अध्यक्ष, जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य

देशाला स्वंत्रय मिळवून देण्यासाठी आपले बलिदान दिले आहे.अशा खऱ्या आद्य क्रांतिकारचा इतिहास काँग्रेसच्या नेत्यांनी लपवला आहे . पूर्वीपासून नेहरू गांधी हे काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे तेच पुढे आले मात्र देशासाठी बलिदान देणारे इतर महापुरुष काँग्रेसवाल्यांनी पुढे येऊ दिले नाही. येथून मागे काँग्रेसने कायमच धर्मविरोधी नेत्यांना पुढे आणले आणि खऱ्या क्रांतिकारकांना मागे ठेवलेत्यामुळे हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्र या तुमच्या वर अन्याय झाला तर तुमच्यासाठी हिंदुत्ववादी आमदार अमोल खताळ हे धावून येतील त्यामुळे तुम्ही त्यांच्या मागे भक्कम उभे रहा.
सागर बेग – प्रखर हिंदुत्ववादी नेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *