पत्रकारांनी अनुभवले दंडकारण्य अभियानातून निसर्ग पर्यटन

  • “चला करूया निसर्ग पर्यटन” अंतर्गत माध्यमांच्या प्रतिनिधींचा दंडकारण्य अभियान पाहणी दौरा

ग्लोबल वार्मिंगची समस्या टाळण्यासाठी थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानाने तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली असून अनेक उघडे बोडके डोंगर आता हिरवेगार दिसू लागले आहेत. तालुक्यातील 30 डोंगरांवर लाखो वृक्षांचे रोपण करण्यात आले असून या हिरवाईची पाहणी संगमनेर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी केली असून संगमनेर हे ठिकाणं पर्यटन स्थळ ठरली असून हा अभिनव उपक्रम देशासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“चला निसर्ग पर्यटन करूया” या अभिनव उपक्रमांतर्गत संगमनेरमधील विविध पत्रकारांनी दंडकारण्य अभियानातून वृक्षारोपण केलेल्या क-हे घाट, खांडगाव येथील कपारेश्वर डोंगर, कोळवाडे येथील हार्मन हिल, मोरया डोंगर, निसर्ग नर्सरी यांना भेट दिली.क-हे घाट येथे एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्यावतीने डोंगर पायथ्याशी चर खोदून (सीसीटी) 25 हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे, याचबरोबर या ठिकाणी ड्रीपची व्यवस्था करण्यात आली असून जनावरांपासून वृक्षांचे संरक्षण व्हावे याकरता एका व्यक्तीची नेमणूकही करण्यात आली आहे.


तर कपारेश्वर डोंगरावर 35 एकरामध्ये 25 हजार वृक्ष वाढले असून येथेही ड्रीपची व्यवस्था, राखण व्यवस्था करण्यात आली आहे याचबरोबर येथे मालपाणी परिवारांनेही पन्नास हजार झाडांचे रोपण केले आहे. कोळवाडे येथील हार्मन हिल येथे 40765 वृक्षांची रोपण करण्यात असून यामध्ये 157 प्रकारचे वृक्ष आहेत. हे वृक्ष आता वाढले असून वनराई निर्माण झाली आहे. याचबरोबर मोर, वानर, ससे, यांसह वन्य प्राण्यांचा वावरही या विभागांमध्ये जास्त झाला आहे.

तसेच मोरया या उंच डोंगरावरही 11000 वृक्षांची रोपण करण्यात आले आहे. अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्यावतीने तालुक्यातील 31 डोंगरांवर विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण केले आहे, याचबरोबर या वृक्षांसाठी ठिबक सिंचनद्वारे पाण्याची व्यवस्था आणि राखण्याची व्यवस्था सुद्धा केली आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली असून तालुका हिरवागार झाला आहे. 30 कोटी बियांचे रोपण झाले व तीस लाख वृक्षांचे रोपण झाले विविध डोंगरांवर आता हे सर्व वृक्ष दिसू लागली आहेत यामुळे तापमान कमी होण्यास नक्की मदत झाली असून ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे या पर्यावरण संवर्धन संस्कृती या चळवळीत सर्वांनी सहभाग घेणे गरजेचे आहे असं माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी म्हटलंय.

वनराईमुळे तालुक्यातील उष्णता व तापमान कमी झाली असून ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये आपला तालुका हिरवा झाला असून जे कोणी नाव ठेवत असेल त्यांनी नक्की दंडकारण्य अभियान येऊन पहावे असं मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी म्हटलंय. निसर्ग पर्यटन सहलीत सहभागी झालेल्या पत्रकार बांधवांनी या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केलंय तर प्राध्या. बाबा खरात यांनी विविध गीतांच्या माध्यमातून सर्वांमध्ये चैतन्य निर्माण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *