- पैशाच्या पाकीटावर नाव टाकून मतदारांचा केला अपमान !
- फॉरवर्ड ब्लाॅक पक्षही जनतेत घेवून जाता आला नाही !
शहरातील मतदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने मेवा समितीला अखेर तालुक्यातील कार्यकर्ते आणून प्रचार रॅली काढण्याची नामुष्की आली आहे.फाॅर्वड ब्लाॅक पक्षाचे अस्तित्वही निवडणुकीत कुठे दिसू शकलेले नसल्याचा आरोप युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देशमुख यांनी म्हणले आहे की,मागील अनेक वर्ष पालिकेत सता असतानाही कोणताही विकास शहराचा होवू शकलेला नाही.त्यामुळेच थोरात तांबे परीवावर कोणताही विश्वास शहरातील मतदारांचा राहीलेला नाही.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हीजन एक दोन काढून नागरीकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.खोटे स्वप्न दाखवले गेले.पण संगमनेरची जनता सूज्ञ असून मेवा समितीच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणारी नसल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व सतास्थान असतानाही विकास करता आला नाही.केवळ ठेकेदार सांभळण्याचे काम कसे झाले जनतेने अनुभवले असल्याने प्रचारात मेवा समितीला निवडणुकीत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळेच संस्था मधील सर्व कर्मचारी आणून गर्दी जमावावी लागली.प्रचार रॅलिकडे सुध्दा शहरातील मतदारांनी पाठ फिरवल्याने तालुक्यातील कार्यकर्ते आणावे लागल्याची केविलवाणी परीस्थिती मेवा सितीवर ओढवली असल्याची टिका पत्रकातून करण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू झालेल्या अर्थपूर्ण चर्चेचा परिणाम मेवा समितीच्या समर्थकांमध्ये दिसून आला आहे.त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये झालेली धुमचक्री ही निवडणुकीतील पैशाची मस्तीच आहे.प्रभाग क्रमांक दोन मध्ये कर्मचार्याच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटताना पकडले गेल्याने मेवा समितीचा चेहरा उघडा पडला आहे.पाकीटावर मतदारांची नाव टाकून पुन्हा एकदा स्वाभीमानी मतदारांचा अपमान थोरात तांबेनी केला आहे.ज्यांना नाकर्तेपणा मुळे काॅग्रेस पक्ष आणि चिन्ह गमवला त्यांना फार्वर्ड ब्लाॅक पक्ष सुध्दा लोकापुढे घेवून जाता आला नसल्याचे देशमुख म्हणाले.



