मागील एक वर्षात वाढलेले अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या तस्करीमुळे संगमनेरकर चिंतेत

सुसंस्कृत व वैभवशाली शहर ही ओळख असलेल्या संगमनेर शहरांमध्ये मागील एक वर्षापासून अत्यंत असुरक्षित वातावर निर्माण झाले असून वाढलेले अवैध धंदे, ड्रग्स सह अमली पदार्थांची तस्करी यामुळे संगमनेर सर्व मधील व्यापारी नागरिक पालक महिला चिंतेत आहेत.

वैभवशाली इमारती हायटेक बस स्थानक शिक्षणाचे गुणवत्ता पूर्ण केंद्र आरोग्याची सुविधा समृद्ध बाजारपेठ शांतता सुरक्षितता आणि सर्वधर्मसमभाव ही ओळख असणाऱ्या संगमनेरने प्रगती मधून राज्यामध्ये आपला लावलौकिक निर्माण केला.

मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर शहरांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यामध्ये दडपशाही व दहशत निर्माण झाली असून शहरांमध्ये अमली पदार्थांची तस्करी सुरू झाली आहे. शाळा महाविद्यालयीन सहज ही पदार्थ उपलब्ध होत आहे. अमली पदार्थांसह ड्रग्स, इंजेक्शन, नशेच्या गोळ्या यामुळे सर्व पालक व नागरिक चिंतेत आहे. शेजारील तालुक्यामध्ये यापूर्वी या सगळ्या गोष्टी घडायच्या मात्र संगमनेर मध्ये कधीच घडत नव्हत्या. आता एक वर्षापासून हे सर्व सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम मुंगसे यांनी म्हटले आहे तर हे तरुण पिढीसाठी अत्यंत साहित्यिक अरविंद गाडेकर यांनी म्हटले आहे.

शहरांमध्ये वाढलेली फ्लेक्स बाजी ज्यांचे कोणतेही कामांमध्ये योगदान नाही असे नवीन निर्माण झालेले फ्लेक्स वरील सामाजिक कार्यकर्ते यांनी संगमनेर बस स्थानकाला अनाधिकृत फ्लेक्सच्या माध्यमातून विळखा घातला होता. याबाबत वेळोवेळी आवाज उठवला गेला मात्र नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. हे चुकीचे होते.

मात्र आचारसंहिता लागल्याने सर्व फ्लेक्स काढण्यात आल्याने बस स्थानकासह विविध ठिकाणच्या जागांनी मोकळा श्वास घेतला आहे. शहराचे विद्रूपीकरण थांबावे याकरता जेष्ठ नागरिक संघाने मोहीम उघडली होती मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे फ्लेक्स बाजी कायम राहिली.

तरुण पिढी हे भविष्य असून त्यांना संगमनेर मध्ये अमली पदार्थ उपलब्ध होत आहे अत्यंत चिंतेचे आहे याकडे प्रशासनाने अधिक गंभीरतेने पहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जोंधळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *