संगमनेर तालुक्यातील साकुर-मांडवे रोडवरील हवालदार वस्ती या ठिकाणी पावसामुळे एक मोठा खड्डा पडला आहे. तर या खड्ड्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून त्याठिकाणावरून प्रवास करावा लागतोय, गेली तीन-चार दिवसांपासून सलग सुरु असलेल्या पावसामुळे हवालदार वस्ती या ठिकाणी हा खड्डा पडला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची पहाणी करून साकुर ते शिंदोडी रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे.
प्रतिनिधी – रमजान शेख



