बांधकाम कामगारांकडून पैसे घेणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार – आमदार अमोल खताळ यांचा गर्भित इशारा

बांधकाम काम कामगारांचे प्रकरण तयार करण्यासाठी शासनाकडून कोणताही खर्च येत नाही. केवळ एक रुपया शुल्क शासनाला भरावा लागतो तोही महायुती कार्यालयामार्फतच भरला जाईल . असे असतानाही बांधकामकामगारांकडून कोणी पैसे घेत असेल, तर अशा व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले जातील. असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.
शहरातील मातोश्री लॉन्स येथे बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने तालुक्यातील१५००बांधकाम कामगारांना आ . खताळ यांच्या हस्ते भांडी वाटप करण्यात आली. त्यावेळी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते . यावेळी अहिल्या नगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त रेवननाथ भिसले, सरकारी कामगार अधिकारी आप्पा चाटे, दुकाने निरीक्षक प्रकाश भोसले ,ललित दाभाडे , शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे, भाजप शहर प्रमुख पायल ताजने, महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले, उप जिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ, शिवसेना महिला तालुकाप्रमुख संगीता बांबळे, शहर प्रमुख वैशाली तारे ,रेखा गलांडे, ज्योती भोर, संगीता पुंड आदी मान्यवर उपस्थित होते.


आ .खताळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य व तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना पोहोचविण्याचे काम महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले जात आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा” या भूमिकेतून पारदर्शकपणे योजना राबवल्या जात आहे भविष्यात बांधकाम कामगारांना कुठल्याही प्रकारचे आजार उद्भवल्यास शासनाच्या वतीने स्वतंत्र रुग्णालयाची निवड केली जाणार आहे या रुग्णालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या मुला मुलींच्या विवाहासाठी शालेय शिष्य वृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अर्थसाह्य दिले जात आहे . आत्तापर्यंत बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने तालुक्यातील ४० हजार ८३५ लाभार्थीं पैकी ४ हजार ७५४जणांना शिष्यवृत्ती दिली असून त्यावर आत्ता पर्यंत राज्य सरकारकडून ४ कोटी ४१ लाख दिले गेले आहे.

२० सप्टेंबरपर्यंत ६ हजार ८४० भांडी संच वाटप पूर्ण, केले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लवकरच ३००० बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले . बांधकाम कामगारा प्रकरणावर आता ग्रामसेवकाच्या सही शिक्क्याची गरज नाही तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचा सही शिक्का आवश्यक आहे तो जर तुम्हाला मिळत नसेल तर महायुतीच्या कार्यालया मध्ये फॉर्म भरा त्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कॉन्ट्रॅक्टरची सही शिक्कासुद्धा उपलब्ध करून दिला जाईल त्यामुळे येथून पुढील काळामध्ये तालुक्यातील बांधकाम कामगारांनी या योजनेपासून वंचित राहू नये असे आवाहन आमदार खताळ यांनी केले .

यावेळी आमदार खताळ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते रुपाली संतोष मंडलिक यांच्या पाल्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी ६०,हजार राजश्री सुनील थोरात यांच्या पाल्यांना पदविका/पदव्युत्तर शिक्षणासाठी २० ,हजार दत्तात्रय विष्णू नेहे यांच्यापाल्यांना दहावी-बारावी शिक्षणासाठी ₹१० हजार संतोष तनपुरे यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याकरिता २० हजार रुपयांच्या धनादेश बांधकाम कामगार लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले यावेळी बांधकाम विषयक योजना विषयीची माहिती अहिल्यानगरचे सहाय्यक बांधकाम आयुक्त रेवांना डीसले यांनी दिली. शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे शिवसेना महिला शहर प्रमुख वैशाली तारे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऍडव्होकेट गोरक्ष काटकर यांनी केले तर शिवसेनेचे उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

आगामी निवडणुकीत साथ द्या

ज्याप्रमाणे तुम्हाला शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी जाणून-बुजून अडचणी निर्माण केल्या जात होत्या परंतु आता तुम्ही मला या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली आहे त्यामुळे कुठल्याही अडचणी येणार नाही परंतु आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्ही सर्वजण महायुतीच्या पाठीमागे उभे राहून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी मला साथ द्या असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *