- थोरात कारखान्याच्या इमारतीमुळे संगमनेरच्या वैभवात भर
- कार्यकर्त्यांची मोठी फळी असून विकासाची वाटचाल कायम ठेवणार
स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासह मागील पिढीतील व्यक्तींनी दिलेल्या योगदानातून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला गेला आहे. आपण कायम सर्वांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास साधला आहे. मात्र काही लोक विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत .कार्यकर्त्यांची मोठी फळी ही आपली ताकद असून अडचणीच्या काळातही सर्व कार्यकर्ते एकसंघ आहेत. यापुढील काळातही ही एकजूट कायम ठेवताना विकासाची वाटचाल कायम ठेवायची आहे .कारखान्याचे माजी पदाधिकारी, सभासद, कामगार या सर्वांच्या योगदानातून संगमनेरच्या वैभवात भर टाकणारी थोरात कारखान्याची अद्यावत इमारत उभी राहिली असल्याचे गौरवउद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी चेअरमन बाळासाहेब पाटील गुंजाळ, बाजीराव पाटील खेमनर, ॲड माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे ,बाबासाहेब ओहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, व्हा.चेअरमन पांडुरंग पा. घुले, रणजीत सिंह देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, अजय फटांगरे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, हौशीराम सोनवणे, इंद्रजीत भाऊ थोरात,राजेंद्र गुंजाळ, रामदास पा. वाघ, कारखान्याचे संचालक संतोष हासे, संपतराव गोडगे, इंद्रजीत खेमनर, डॉ. तुषार दिघे, रामदास धुळगंड, नवनाथ आरगडे, रामनाथ कुटे, विनोद हासे ,विजय राहणे, गुलाब देशमुख ,अरुण वाकचौरे, योगेश भालेराव ,लता गायकर ,सुंदरबाई दुबे ,दिलीप नागरे, अंकुश ताजने, मा. संचालक गणपतराव सांगळे ,चंद्रकांत कडलग, आर्किटेक्ट बी आर चकोर, सुभाष सांगळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखाना उभारणीमध्ये आणि वाटचालीमध्ये स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याबरोबर अनेक जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचा वारसा आपण सांभाळाला आहे. कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना विकासात मोठे योगदान दिले आहे. काटकसर ,पारदर्शकता जपताना उसाला उच्चांकी भाव दिला आहे. अनेक दिवस कार्यालयाची इमारत प्रलंबित होती. आर्थिक स्थिती चांगली असताना नवीन प्रशासकीय इमारत व्हावी ही सर्वांची इच्छा होती.
नवी झालेली इमारती सर्व सोयीयुक्त असून या इमारती म्हणजे सर्व मा. चेअरमन, पदाधिकारी, कामगार, शेतकरी, सभासद या सर्वांचे प्रतीक आहे.






तालुक्याच्या विकासाची वाटचाल करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतले विविध कार्यकर्त्यांना जिल्हा व राज्य पातळीवर पदे दिली. संगमनेर तालुक्यात कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. अडचणीचा काळ आहे. अनेकांना त्रास दिला जात आहे मात्र कार्यकर्ते डगमगत नाहीत हीच ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे. विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु कार्यकर्ते भक्कम राहिले आहे ही विकासाची वाटचाल कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, सहकारात कारखान्याची इतकी वैभवशाली आणि सुंदर इमारत कुठेही नसेल अशी संगमनेर मध्ये उभी राहिली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा देशाला दिशादर्शक असून सर्वसामान्यांचे जीवन घडवणाऱ्या सहकारातील राज्याचे नेतृत्व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर नवनाथ आरगडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी , सभासद शेतकरी, ऊस उत्पादक, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांचा सन्मान
अत्यंत भव्य दिव्य व सर्व सुविधा नियुक्त झालेल्या या इमारतीच्या उद्घाटनासाठी मोठमोठी नावे समोर आली परंतु ज्यांनी तालुक्याच्या आणि सहकाराच्या उभारणीत मोठे योगदान दिले त्यांचा सन्मान व्हावा याकरता सर्व मा. चेअरमन यांच्या हस्ते आज या इमारतीचे उद्घाटन होत असून हा जुन्या पिढीचा सन्मान असल्याचे गौरवोद्गार मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.



