- कुंभारवाडा येथील शिवसेना शाखेचा आ अमोल खताळ यांच्या हस्ते शुभारंभ
शिवसेना पक्षात कार्यकर्ता या पदाला महत्त्व आहे शिवसेनेमध्ये कोणी नोकर आणि चालक नाही तर सर्वजण कार्यकर्ते आहेत, मी जरी या तालुक्याचा आमदार असलो तरी मी प्रथम कार्यकर्ता आहे, त्यामुळे या शाखेच्या सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावत असताना त्यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेर शहरातील कुंभारवाड येथे सुरू करण्यात आलेल्या शिवसेना शाखेचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे , विनोद सूर्यवंशी, राहुल भोईर, जावेद जहागिरदार, शशांक नमन, शशिकांत (लाला) दायमा, शिवसेना शाखा प्रमुख आदित्य जोर्वेकर, अनिरुद्ध वालझाडे, अजित भारते, ओंकार शिंदे, अक्षय चिलाप, विनायक वडतल्ले, प्रकाश पवार, अक्षय सस्कर, अजय वालझाडे, सौरभ वाकचौरे, ओंकार जंगम, राजेश पद्मा, शुभम क्षत्रिय वेदांत मंचरकर, विश्वेश मोहरीकर, दिनेश वडतल्ले, तसेच महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ, शहर प्रमुख वैशाली तारे, पूनम दायमा, श्रुती भारते, स्वाती वाकचौरे, माया वालझाडे, मंगल वालझाडे व इतर महिला भगिनी, पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मला तुम्ही आठ महिन्यापूर्वी निवडून दिले तेव्हापासून आपण सर्वांचीच कामे करत आहोत, आणि एक-एक माणूस जोडत आहोत, महायुती परिवारामध्ये येणाऱ्यांचे आपण स्वागत करतो आहे. शिवसेना प्रमुख सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जसे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण केले तसेच राजकारण आपणही करत आहोत, त्यामुळे खऱ्या अर्थाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना कोणी आता विचारत नाही अशी टीका आमदार अमोल खताळ यांनी केली.

शिवसेना पक्षात नुसते पदे घेऊन मिरवायचे काम करू नका तर सर्व सामान्य गोर-गरीब, कष्टकरी, वंचित यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांची विकास कामे करा,लाला दायमा सारखा तरुण काँग्रेसकडे होता मात्र काँग्रेस खालच्या पातळीचे राजकारण करते म्हणून त्याने तीन महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तुम्ही सर्व युवा कार्यकर्त्यांनी एकत्रित येत शिवसेनेची शाखा सुरू केली आहे, या शाखेच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर द्या, तुमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविले जातील असा मला विश्वास आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी ज्याप्रमाणे सर्वसामान्य शिवसैनिकाला मानसन्मान दिला, ती परंपरा मध्यंतरीच्या काळात खंडित झाली होती, परंतु अनेकशिवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला असल्यामुळे शिवसेनेचे मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यामध्ये शिवसेना वाढत आहे, शिवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रात ८० जागा शिवसेनेच्यावतीने लढवल्या गेल्या त्यापैकी 60 जागा जिंकले. आपल्याला फक्त या शहराचा, तालुक्याचा विकास करायचा आहे. विरोधकांनी सर्व सामान्य जनतेचा विकास न करता बगलबच्चे यांचा विकास केला आहे, परंतु आपल्याला सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे. शिवसैनिकांनी पक्षाचे काम वाढवायचे आहे, काम करत असताना प्रत्येकाने एकमेकांमध्ये समन्वय ठेवायचा आहे आणि येत्या आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर कोणत्याही परिस्थिती मध्ये भगवा फडकवायचाच आहे, यासाठी सर्वांनी कामाला लागावे. कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी केले, उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिवसेनेचे लाला दायमा यांनी केले तर सर्वांचे आभार शिवसेना शाखाप्रमुख आदित्य जोर्वेकर यांनी मानले.



