दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यासह अनेक डोंगर हिरवे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

  • तालुक्यात वृक्षांबाबत जागृती वाढली
  • मालदाड येथे 20 व्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ

झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून प्रेरणा घेत स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षांबाबत मोठी जागृती झाली आहे. विविध उघडी बोडके डोंगरांसह तालुका हिरवागार झाला असून या अभियानाची देशपातळीवर दखल गेली असल्याचे गौरव उद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

मालदाड मायंबा डोंगर कानिफनाथ मंदिर परिसरामध्ये जयहिंद लोकचळवळ व अमृत उद्योग समूहाच्या वतीने 20 व्या दंडकारण्य अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवर्तक मा.आ.डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, बी आर चकोर, सरपंच गोरख नवले, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, योगेश भालेराव, गोरख नवले, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, जगन्नाथ घुगरकर, अनिल शिंदे , डॉ. सुजित खिलारी आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सरपंच गोरख नवले यांनी मालदडमध्ये अत्यंत चांगले काम केले असून 85 एकरवर वनराई फुलवली आहे. विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे मोठा बदल येथे झाला आहे. दंडकारण्य अभियान यामुळे तालुक्यात वृक्षांबाबत मोठी जागृती झाली. उघडी बोडकी डोंगर हिरवीगार दिसू लागली आहे. तळेगाव भागातही वृक्षराई वाढली आहे.

जे लोक काही करत नाही. ते मात्र नाव ठेवण्याचे काम करत असतात. त्यांनी किती झाडे लावली हा मोठा प्रश्न आहे. काही मंडळी चांगले चाललेले मोडायला निघालेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला भ्रमित करण्याचे काम सुरू इतरांबद्दल खोटे सांगून स्वतःबद्दल कौतुक केले जात आहे. देशभर हा काही पक्षांचा कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली.

याचबरोबर वृक्षारोपण आणि संवर्धन हे काम जिकरीचे आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण येते याचबरोबर जनावरांपासून संरक्षण अशा सगळ्या बाबी जरी असल्या तरी तालुक्यात वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि त्यामुळे तालुका हिरवा गार झाला आहे. हे काम आपल्या सगळ्यांना मिळून पुढे न्यायचे आहे. तालुक्यात प्रत्येक गावात अनेक विकास कामे आपण सातत्याने राबवली आहे याचबरोबर दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण आणि कालवे आपण पूर्ण केले. उर्वरित काळामध्ये या पाण्याचे वितरण आणि कालव्याच्या वरच्या भागाला पाणी देण्याचे नियोजन होते. यापुढेही ते झाले पाहिजे. यावर्षी मे महिन्यात चांगला पाऊस झाला कालव्यातून आणि चारींमधून पाणी सुरू आहे. हे सर्व आपण करून ठेवले आहे. ही विकासाची वाटचाल आपल्या सर्वांना जपायचे असल्याचे ते म्हणाले.

तर माधवराव कानवडे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील नागरिकांसाठी खूप परिश्रम घेतले. गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या. निळवंडे धरण कालवे पूर्ण केले. काम त्यांनी केले मात्र आता श्रेय दुसरे घेत आहे. 24 तास काम करणाऱ्या या माणसाने काय कमी केले होते. तालुक्यातील जनतेने चूक केली आहे. यापुढे अशी चूक करून चालणार नाही. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे तालुक्याचा स्वाभिमान आणि अस्मिता असून या सुसंस्कृत नेतृत्वाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी हौशीराम सोनवणे, ॲड नानासाहेब शिंदे, विष्णुपंत रहाटळ, उपसरपंच गणेश भालेराव, सौ अर्चनाताई बालोडे ,सौ प्रमिलाताई अभंग, सौ मंदाताई नवले, मंगेश नवले बाळासाहेब सोपान नवले रामभाऊ नवले कुंडलिक नवले रामा कोंडाजी नवले संभाजी पंढरीनाथ नवले यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे स्वागत सरपंच गोरख नवले यांनी केले. प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर योगेश भालेराव यांनी आभार मानले. याप्रसंगी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी विद्यार्थ्यांच्या समवेत दंडकारण्य अभियान व पर्यावरण संवर्धनाची गीते गाऊन परिसर आनंदमय केला. याप्रसंगी परिसरातील नागरिक कार्यकर्ते व अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • गोरख नवले हे आदर्श सरपंच

सतत जनतेच्या विकासाचा ध्यास घेऊन गोरख नवले यांनी विकास कामांचा पाठपुरावा केला. 85 एकर वर वनराई फुलवली असून धडाडीने काम त्यांचे सुरू आहे. आपण संगमनेर ते चिंचोली गुरव हा रस्ता पूर्ण केला. या सर्व कामांसाठी पाठपुरावा करणारे गोरख नवले हे जनमान्य आदर्श सरपंच असल्याचे माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *