त्या कृषी पर्यवेक्षकाचे अखेर निलंबन

संगमनेरच्या कृषी विभागात कार्यरत असलेल्या कृषी पर्यवेक्षक सुरेश घोलप यांच्या अश्लील व्हिडिओमुळे संपूर्ण कृषी विभाग बदनाम झाला आहे, यावर संगमनेर येथे कार्यरत असलेले कृषी पर्यवेक्षक सुरेश घोलप यांचं निलंबन केल आहे.कृषी विभागाने तातडीने पावले उचलत कृषी विभागाचे पर्यवेक्षक सुरेश घोलप यांना निलंबित कलं आहे

. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी ही माहिती दिली आहे. 16 मे रोजी या महाशयाने आपल्याच कार्यालयातील एका महिलेचे अश्लील व्हिडिओ ग्रुप वरती शेअर केले होते. त्यानंतर संगमनेरच्या कृषी विभागात आणि संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती .त्यानंतर या रंगील कृषी पर्यवेक्षकाची तक्रार त्याच्याच धर्मपत्नीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर सी न्यूज मराठी ही बातमी प्रसारित करतात काही तासाच्या आत या कृषी पर्यवेक्षकाचे निलंबन केलं आहे. या रंगेल कृषी पर्यवेक्षकाचे कारनामे यापूर्वीही चर्चिले गेले होते .अखेर प्रसार माध्यमांमध्ये या बातम्या प्रसारित होताच तात्काळ कृषी विभागाने पावले उचलत अखेर सुरेश घोलप या लफडेबाज कृषी पर्यवेक्षकाचं तात्काळ निलंबन केल आहे .त्याची प्रतही संगमनेरच्या कृषी विभागाला प्राप्त झाली आहे.

(प्रतिनिधी – बाबासाहेब कडू संगमनेर)