लंपी आजारावर पोल्ट्रीका आयुर्वेद औषधाने मात करणं शक्य

प्राण्यांची प्रतिकारशक्ती जशी जशी कमी होत जाते तसे तसे ते वेगवेगळ्या साथींच्या  आजारांना बळी पडतात. प्राण्यांमधील आजार प्रामुख्याने बर्ड फ्लू, लंपी स्किन डिसीज, एफ एम डी ( लाळे खुरकूत ) हे विषाणूजन्य आजार त्यामध्ये प्रमुख आहेत. या आजारांची लागण झाल्यास अगदी कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणात बाधा प्राण्यांमध्ये होत असते. या विषाणूच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती प्राण्यांमध्ये तयार करण्यासाठी अश्वमेध च्या संशोधनातून *पोल्ट्रीका* हे उत्पादन मागील वर्षी बाजारात आले होते त्याचे आता पेटंट प्रकाशित झाले असून येणाऱ्या काळामध्ये हे उत्पादन देशात साथ रोगावर  मोठी भूमिका बजावेल.  मागील वर्षी लंपी  स्कीन डिसीज या जनावरांमध्ये आफ्रिकेतून आलेल्या आजारावर पोल्ट्रीकाचे हजारो प्रात्यक्षिक चाचण्या  घेण्यात आल्या, त्यामध्ये जनावरांना त्याचा चांगला फायदा झाला आणि ते तंदुरुस्त झाले. काही ठिकाणी सर्व उपचार करून सोडून दिलेले जनावरे देखील पोल्ट्रीका वापरून तंदुरुस्त झालीत. चालू वर्षी देखील लंपी स्कीन डिसीज देशात मोठ्या प्रमाणात प्राण्यांमध्ये आलेला असून त्याच्या नियंत्रणासाठी अश्वमेध चे पोल्ट्रीका मोठी भूमिका बजावत आहे. आता या उत्पादनाचे भारतीय पेटंट प्रकाशित झाल्यामुळे त्याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना होणार आहे. हे देशी पेटंट असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना ते कमी किमतीमध्ये उपलब्ध होत आहे.अश्वमेधचे संशोधन हे चालू घडामोडींवर आधारित असून नवनव्या समस्यांवर अश्वमेधने शेतकऱ्यांना संशोधनाच्या माध्यमातून मदत केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोल्ट्रीका हे पेटंट बघितले पाहिजे. यापूर्वी माणसांमध्ये आलेल्या कोविड संसर्ग  विकार,  पॅरालिसीस आणि प्रोस्टेट विकार, मेंदू रोग , मूळव्याध, किडनी स्टोन, जनावरांमधील मस्टायटीस असेल या वरती  अश्वमेध ने ऑपरेशन विरहित उपचार या उपचार पद्धती साठी अनेक उत्पादने विकसित केली असून त्यांचे देखील पेटंट प्रकाशित झालेले आहे.लंपी स्किन आजारावर अगदी तीन ते चार दिवसात नियंत्रण आणण्यासाठी जनावरांची प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. त्या दृष्टीने पोल्ट्रीका हे उत्पादन मोठी भूमिका बजावेल. त्यासाठी गोठा धारक शेतकऱ्यांनी सदर उत्पादन नियमित घरी ठेवून संसर्ग टाळावा व वेळ न  घालवता आपल्या जनावरांची आरोग्य सेवा करावी,असे आव्हान डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी पशुपालकशेतकऱ्यांना केले आहे.