आ. थोरात यांनी निर्माण केलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे तालुक्यात पाण्याची समृद्धी – इंद्रजीत थोरात

 काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सिमेंटचे जाळे निर्माण झाल्याने तालुक्यात पाण्याची समृद्धी निर्माण झाली आहे. यावर्षीच्या चांगल्या पाऊस पाण्यामुळे  अंभोरे धरण पूर्ण भरले असून या धरण्याच्या ओव्हरफ्लो पाण्यातून कारखान्याच्या सहकार्याने भरविण्यात आलेल्या मालुंजे येथील धरणाचे जलपूजन आज मोठ्या उत्साहात करण्यात आले.

अंभोरे व मालुंजे धरणाचे जलपूजन इंद्रजीतभाऊ थोरात, राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख  कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन संतोष हासे , उपसभापती नवनाथ अरगडे , शॅम्प्रोचे व्हा. चेअरमन सुभाष सांगळे , रावसाहेब खेमनर , लहानु खेमनर ,  सहादू खेमनर , किसनराव खेमनर , बबनराव खेमनर, भाऊसाहेब वाघमोडे , वाल्मीक  खेमनर,  भागवत जगनर , हौशिराम वाघमोडे , तुळशिराम मलगुंडे , भागवत खेमनर , कोडांजी वाघमोडे , बाबूराव खेमनर , बी. एस. खेमनर , भाऊसाहेब खेमनर , शरद खेमनर , बालूजी येथे संतोष नागरे निवृत्ती घुगे संजय खरात गणेश डोंगरे तात्याबा डोंगरे संपत सोसे , सुंदर खेमनर ,   गोरक्षनाथ खेमनर , ग्रामविकास अधिकारी जेजुरकर, आंभोरे व मालुंजे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवरील नद्या ओढ़े नाले यांच्यावर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केले आहे आणि यामुळे पाणी ठिकठिकाणी अडवले जात आहे यामुळे तालुक्यात पाण्याची समृद्धी वाढली आहे याचबरोबर तालुक्याला वरदान ठरणारे निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले असून कालव्याची कामे ही अंतिम टप्प्यात आहे येत्या काही दिवसात निळवंडे चे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात दिसेल तो तालुक्याचा सुवर्ण दिवस असेल असेही ते म्हणाले.

तर  रणजीत सिंह देशमुख म्हणाले की अंभोरे धरण पूर्ण क्षमतेने भरली असून यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने या धरणातील ओर फ्लो चे पाणी हे मालुंज धरण्यात सोडण्यात आले आहे त्यामुळे तेथील नागरिकांमध्येही समाधान निर्माण झाली आहे पाणी हीच खरी संपत्ती असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होत असल्याचे ते म्हणाले तर बाबा ओहोळ म्हणाले की आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने कायम शेतकऱ्यांना मदत केली आहे. यावेळी अंभोरे डिग्रस मालुंजे शेडगाव या परिसरातील ग्रामस्थ  व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.