आयुष्यमान भारत योजनेच्या चौथ्या वर्षपुर्तीनिमित्त अहमदनगरमधील ४२ रुग्णालयांमध्ये एकाच वेळी आरोग्य शिबीर

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला 23 सप्टेंबर 2022 रोजी चार वर्षे पूर्ण होत असून महाराष्ट्रात ही योजना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या राबविली जाते.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला चार वर्ष पूर्ण झाले असून या योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना आरोग्य हेल्थ कार्ड देण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकाच वेळी विविध अंगीकृत 42 रुग्णालयांमध्ये आज आरोग्य शिबिरे घेऊन नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्य हेल्थ कार्ड देण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ.वसीम शेख, समन्वयक डॉ. मयूर मुत्था,दक्षता अधिकारी विठ्ठल वांडेकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ .प्रवीण गुंजाळ,जिल्हा पर्यवेक्षक राहुल उकिर्डे,दिगंबर कौसे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्रांनी परिश्रम घेतले.

(प्रतिनिधी – लखन गव्हाणे,शिर्डी)