वरद विनायक सेवाधाम हे समाज सुधारण्याचे केंद्र – जि.प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील

वारकरी संप्रदाय परंपरेतून आणि संतांच्या सहवासातून जीवनात चांगले बदल घडतात. पद्मश्री विखे पाटील आणि खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या वारकरी संप्रदायाची विचारधारा आजही विखे कुटूंबियांकडून सातत्याने जपली जात आहे. वरद विनायक सेवाधामच्या माध्यमातून समाजाला चांगले आचार व विचार देण्याचे काम सुरू असून महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या अथक प्रयत्नातून अल्पावधीतच हे स्थान समाज सुधारण्याचे केंद्र बनले आहे. संत परंपरा ही मानवी जीवन सफल होण्यासाठी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनिताई विखे पाटील यांनी केले.
प्रास्तविक करतांना उध्दव महाराज मंडलिक म्हणाले की, वरद विनायक सेवाधाम क्षेत्राला जिल्हा परिषदेतर्फे क वर्ग दर्जा मिळालेला आहे. जि.प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या पुढाकारने व पाठपुराव्याने प्रतिवर्षी जिल्हा परिषदेमार्फत सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा निर्माण होत आहेत. आव्हाने घ्यायची व ती उत्तमरित्या पेलायची ही विखे कुटूंबाची खासीयत आहे. कोरोनाचा प्रभाव आहेच परंतू आता त्यासोबत पुढे चालावे लागणार आहे. सर्व मानवी समाजाला आनंद निर्माण होण्यासाठी एकत्र य़ेवून उत्सव साजरा करण्याची भारतीय संस्कृती आहे. ता. ५ फेब्रुवारी या महोत्सवाची सांगता सायंकाळी ६ ते ८ यावेळेत काल्याचे किर्तनाने होणार आहे. या किर्तन महोत्सवाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की, दान आणि भगवंत सेवेच्या माध्यमातून आत्मिक समाधान व शांती मिळते. चांगल्या गोष्टी समजण्यासाठी संतांची संगत महत्त्वाची आहे. कार्यक्रम प्रसंगी सुर्यकांत निर्मळ, कचरू निर्मळ, बापुसाहेब आहेर, विखे पा. कारखान्याचे संचालक संजय आहेर, संचालक कैलास तांबे, विलास थोरात, रामनाथ आहेर, अनिल विखे, सोपान कासार, दादासाहेब धावने, चांगदेव विखे,अण्णासाहेब पाचोरे यांचेसह भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य अर्जुन आहेर यांनी केले.
श्री वरद विनायक सेवाधाम, लोणी (ता. राहाता) येथे श्री गणेश जयंती निमित्त किर्तन महोत्सवाचे उद्घाटन कलश पुजा व ध्वजारोहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार आण्णासाहेब म्हस्के पाटील, सेवाधामचे संस्थापक महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर), सरपंच कल्पना मैड व अनेक मान्यवर उपस्थित होते.
(प्रतिनिधी – लखन गव्हाणे, लोणी)

Leave a Reply