वंचितांपर्यंत ‘आधार’ पोहचविण्यात पत्रकारांचे मोठे योगदान, आधार फाऊंडेशनकडून पत्रकारांचा सन्मान

दहा रुपयांची  किमया ही बिरूदावली घेऊन  समाजातील गरीब, गरजू, वंचित घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी मदत  पोहचवून त्यांना ‘आधार’ देण्याचे काम समाजाच्या सहकार्याने आधार फाऊंडेशन करत आहे. या वंचित घटकांपर्यंत मदत पोहचविण्यासाठी पत्रकारांचे मोठे योगदान राहिले आहे,असे गौरवोद्गार  आधार फाऊंडेशनचे समन्वयक सुखदेव इल्हे यांनी काढले. पत्रकार दिनाचे  औचित्य साधून संगमनेर शहरातील पत्रकारांच्या सन्मानाचे आयोजन आधार  फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सुखदेव इल्हे  बोलत  होते. आधार कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व मराठी पत्रकार दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. आधार फाऊंडेशनच्या वतीने शहरातील सर्व पत्रकारांचा ‘विमान प्रवासाची गोष्ट’ हे पुस्तक, आधारचा ‘मानवता’ विशेषांक, पेन व गुलाबपुष्प देऊन सन्मान  करण्यात आला. यावेळी सुखदेव इल्हे यांनी आधार फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांची यशोगाथाही  सांगितली. समाजातील शेवटच्या घटकातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना विविध  अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही. शासनाच्या योजनाही विद्यार्थ्यांपर्यत पोहचत  नाही. यासाठी आधारने पुढाकार घेऊन अशा गरजू मुलांना शैक्षणिक सुविधा  उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी समाजाचे सहकार्य लाभलेच  परंतू पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आधारचे काम जनतेपर्यंत  पोहचविले. तसेच सुविधांपासून वंचित राहिलेले किेंवा संघर्षात लढा देत  असलेल्या विद्यार्थ्यांचा संघर्ष जनतेसमोर आणला त्यामुळे आधारला काम करणे  सोपे झाले. यावेळी ज्येष्ठ  पत्रकार किसन हासे, डॉ. संतोष खेडलेकर,विकास वाव्हळ, शाम तिवारी,गोरक्ष मदने  आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केले तर  आभार पी.डी. सोनवणे यांनी मानले. यावेळी पत्रकार सोमनाथ काळे,सुनिल महाले, संदीप सातपुते,गोरक्ष नेहे,आनंद गायकवाड,आनंद जोंधळे, अमोल मतकर,संजय अहिरे, बाळासाहेब गडाख,सुयोग हांडे,निलिमा घाडगे,वृत्तपत्र विक्रेते सतिष आहेर यांसह सर्व पत्रकार बंधू भगिनींचा सन्मान करण्यात आला.आधारचे  समन्वयक विठ्ठल कडूसकर, लक्ष्मण कोते, शारदा अरगडे, अनिल कडलग, सोमनाथ मदने आदि उपस्थित होते.

Leave a Reply