प्राप्तीकराच्या कचाट्यातून सहकारी साखर कारखान्यांची सुटका करण्याच्या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय हा प्रवरानगर येथे झालेल्‍या सहकार परिषदेची मोठी उपलब्‍धी

प्तीकराच्या कचाट्यातून सहकारी साखर कारखान्यांची  सुटका करण्याच्या संदर्भात केंद्रीय सहकार  मंत्री अमित शहा यांनी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय हा प्रवरानगर येथे झालेल्‍या सहकार परिषदेची मोठी उपलब्‍धी असून, पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी यासाठी केलेल्‍या लढ्याचे मोठे यश असल्‍याची प्रतिक्रीया आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना व्‍यक्‍त केली.
साखर कारखान्‍यांवर लादण्‍यात येणा-या प्राप्‍तीकराच्‍या संदर्भातील लढाई गेली अनेक वर्षांपासुन सुरु होती. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याने याबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयात सर्वात प्रथम कायदेशिर लढाईला सुरुवात केली होती याकडे लक्ष वेधून आ.विखे पाटील म्‍हणाले की, यापुर्वी केंद्रात सत्‍तेवर असलेल्‍या लोकांनी किंवा ज्‍यांच्‍यावर जबाबदारी होती त्‍यांनी केवळ शिष्‍टमंडळ नेण्‍यापलिकडे काहीच केले नाही. त्‍यामुळे वर्षानुवर्षे हा प्रश्‍न प्रलंबित राहीला. मात्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशात प्रथमच स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या सहकार मंत्रालयाची धुरा मंत्री अमित शाह यांच्‍याकडे आल्‍यानंतर त्‍यांनी तातडीने याबाबत घेतलेल्‍या निर्णयामुळे राज्‍यातील ११६ सहकारी साखर कारखान्‍यांचे ८ हजार ५०० कोटी रुपये माफ झाल्‍याने  कारखान्‍यांना आणि पर्यायाने लाखो शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असल्‍याने सरकारच्‍या या निर्णयाचे आपण मनापासुन स्‍वागत करत असल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले.


शेतक-यांना दिलेल्‍या ऊसाचा भाव हा संपूर्ण व्‍यवसाय खर्च म्‍हणून धरावा अशी मागणी सहकारी साखर कारखान्‍यांची होती. याबाबत १९ ऑक्‍टोंबर २०२१ रोजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्रीय सहकार मंत्र्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीतच २०१६ सालापर्यंतचा प्राप्‍तीकर माफ करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. परंतू १९८५ सालापासुनही काही कारखान्‍यांना आलेल्‍या नोटीसांबाबतही विचार करण्‍याची मागणी मान्‍य झाल्‍याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केंद्रीय कर मंडळाला याबाबतच्‍या केलेल्‍या सुचनांमुळे हा सर्वच प्रश्‍न निकाली निघाला असल्‍याचे समाधान त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

(प्रतिनिधी – लखन गव्हाणे, शिर्डी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *