कोरोना संकटाच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळेच देश आज प्रगतीपथावर – खासदार डॉ.सुजय विखे पाटील

संकटात जनतेच्या पाठीशी खंबरीपणे उभे राहुन त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देतानाच, केंद्र शासनाच्या विविध योजनांमधुन सामान्य माणूस सक्षम करण्याचे काम माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवरा परिवाराने आजपर्यंत केले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
लोणी येथे राहाता तहसिल कार्यालय, पंचायत समिती राहाता, जनसेवा फौंडेशन आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शबरी घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, आम आदमी अपघात विमा, ए.डी.आय.पी अंतर्गत दिव्यांग व्यक्तिंना साधने वाटपाच्या आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ.विखे पाटील बोलत होते.
याप्रसंगी राहाता पंचायत समितीच्या सभापती सौ.नंदाताई तांबे, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, जिल्हा परिषद सदस्य सौ.कविता लहारे, दिनेश बर्डे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, उपसभापती बाळासाहेब जपे, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, कारखान्याचे संचालक धनंजय दळे, सलीम शहा, कैलास सदाफळ, उपसरपंच गणेश विखे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सतिष बावके,सौ.अर्चना आहेर, बबलू म्हस्के, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, नंदकुमार जेजूरकर, किसान मोर्चाचे अध्यक्ष बाबासाहेब डांगे, सुभाष गमे आदिंसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात खा.डॉ.विखे पाटील म्हणाले की, कोण कोणाबरोबर आहे हे मला गरजेचे नाही, देशात केंद्र सरकार सामान्य जनतेला केंद्रबिंदू माणुन काम करीत आहे. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी मध्ये शिर्डी विधानसभा मतदार संघ आघाडीवर आहे. वयोश्री योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात काम आदर्श झाले आहे. माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून मतदार संघात ९८ टक्के लसिकरण पुर्ण झाले असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाने देशात लसिकरणाची मोहीम वेगाने सुरु असल्याबद्दल पंतप्रधानांचे यावेळी अभिनंदन देखील करण्यात आले.








करोना संकटत असले तरी सामान्य माणूस उभा राहीला पाहीजे. शिर्डी विधानसभा मतदार संघात काम करताना विविध योजनांबरोबरच ४० हजार कुटुंबांना रेशनकार्ड देतानाच, योजनेचे लाभार्थी शोधून त्यांना लाभ मिळवून देण्याचे काम मतदार संघात होत असून, मतदार संघ हे आपले कुटुंब असून, प्रत्येक नागरीकाच्या चेह-यावर सलग ५० वर्षांपासुन आनंद देण्याचा प्रयत्न होत आहे. संकट असो किंवा नसे प्रवरा परिवार कायम सामान्य जनतेच्या सोबत आहे असे त्यांनी शेवटी सांगितले, कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांच्या मंजुरीचे पत्र तसेच वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना साहित्यांचे वितर करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक प्रा.डॉ.शांताराम चौधरी केले.
(प्रतिनिधी – लखन गव्हाणे,लोणी)