समता स्कूलची शिक्षणपद्धती कोटा शिक्षण पद्धतीपेक्षा ही उच्च दर्जाची – राजाराम पाटील

समता इंटरनॅशनल स्कूलमधील समता पॅटर्न हा नेहमीच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षामध्ये यश मिळवून देत असून त्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या समताच्या विद्यार्थ्यांबरोबर समताच्या शिक्षकांचा देखील सिंहाचा वाटा असून समतातील प्रत्येक विद्यार्थी हा शैक्षणिक,सामाजिकदृष्ट्या कौतुकास पात्र आहे. असे गौरवोद्गार समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी समतातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून काढले.
प्रसंगी पालक श्री राजाराम पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,पालक म्हणून पाल्याचा सर्वांगीण विकास होणे हे पालकांसाठी खूप महत्वाचे असते.या विचारातून कोपरगाव तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील शाळांचा शैक्षणिक दृष्ट्या आढावा घेतला असता समता स्कूल मधील वातावरण,शिक्षण पद्धती ही उच्च दर्जाची असल्यामुळे आज माझा पाल्य राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत यश संपादन करू शकला त्यामुळे समता स्कूलची शिक्षण पद्धती ही कोटा शिक्षण पद्धती पेक्षाही उच्च दर्जाची आहे.
समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी विश्वजीत पाटील याने २०२०-२१ च्या नीट परीक्षेत ७२० गुणांपैकी ६७९ गुण मिळवत ऑल इंडिया रँकमध्ये ९९९ वा तर जातनिहाय संवर्गातील ओबीसी प्रकारात २४३ वा क्रमांक मिळवला असून भारतातील सुप्रसिद्ध एम्स (AllMS) या वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे तर राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या जेईई परीक्षेत अथर्व परदेशी याने यश संपादन केले असून या परीक्षेत ९७.६३ परसेंटाईल मिळाले तर महाराष्ट्रातील सीईटी परीक्षेत ९९ परसेंटाईल प्राप्त झाले आहे.या यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना समता पॅटर्न चा अवलंब करून समता स्कूलमधील कोटा येथील शिक्षक श्री हेमंत सुमन, श्री राहुल गुप्ता, श्री चेतन शर्मा, श्री जोगेंद्र राजपूत आदींसह समतातील शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सत्काराला उत्तर देताना विश्वजीत पाटील म्हणाले की, लॉकडाउन हा माझ्यासाठी आपत्ती नसून इष्टापत्ती ठरली कारण की मला माझ्या समतातील शिक्षकांचा पूर्ण वेळ मिळाला आणि मला अभ्यासविषयक येणाऱ्या अडचणी कोणत्याही प्रकारची वेळेची मर्यादा न ठेवता केव्हाही फोन केल्यावर सोडवत असे.
तर अथर्व परदेशी म्हणाले की, मी ग्रामीण भागातील असून मला समता स्कूलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे मला या यशात स्कूलच्या शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन आणि उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते १२ नोव्हेंबर २०२१ रोजी स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन,पालक श्री राजाराम पाटील,सौ रोहिणी राजाराम पाटील, श्री संजय परदेशी यांच्या उपस्थितीत सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सत्कार समारंभाचे सुत्र संचालन आणि उपस्थित असलेले हितचिंतक, पालक आदींचे आभार शिक्षिका सौ शिल्पा वर्मा यांनी मानले.
(प्रतिनिधी – शंकर दुपारगुडे, कोपरगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *