शिर्डी शहरात गोळीबार झाल्याने खळबळ, सुरज ठाकूरवर गोळीबार

शिर्डी येथे गेल्या अनेक दिवसांपासून कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याने अतिशय सुखाने नांदत असलेल्या शिर्डी शहरात गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. काल रात्री मंदिरालगत एका हॉटेल च्या पार्किंग मध्ये दोन चांगले मित्र असलेल्या तरुणांच्या टोळीमध्ये चकमक झाली असून त्यात एका सूरज ठाकूर नामक तरुणावर रात्री उशिरा मागील एका वादातून गोळीबार झाल्याची चर्चा असून एक गोळी शरीरात घुसल्याने तरुणाला संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याच्या अंगातली गोळी काढल्याने आता प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र थेट मंदिरालगत गोळीबाराची घटना घडल्याने शिर्डी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री सुमारे 3 ते 4 च्या दरम्यान सदर घटना घडली असून पहाटे पहाटे संपूर्ण शिर्डीत एकमेकांना फोन करत प्रत्येक जण गोळीबार झाल्याची खात्री करून घेत होता. रुग्णालयामध्ये सूरज ठाकूरच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून प्रत्येकाच्या तोंडी रात्रीच्या गोळीबाराची चर्चा दिसून आली अनेकांनी वेगवेगळ्या कारणांनी हा गोळीबार झाल्याचे सांगत अफवांना उत आला आहे काही जण तर चक्क 3 गोळ्या शरीरात गेल्याचे सांगत 7 ते 8 राऊंड फायर झाल्याचे सांगत आहेत आता त्या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याने चुकीची माहिती कोणी पसरवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आता नागरिक बोलत आहेत. गोळीबार कोणी केला हे अजुन स्पष्ट नसले तरी प्रत्येकाच्या तोंडी वेगवेगळे नाव आहे मात्र सदर प्रकरणी शिर्डी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दखल करण्याचे काम सुरू असून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचे नाव आणि गोळीबाराचे कारणही समोर येईल.
(प्रतिनिधी – लखन गव्हाणे, शिर्डी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *