लोणी खुर्दमध्ये ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार शिगेला

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द मधील प्रभाग क्रमांक 2 ची जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणुक होणार आहे. या निवडणूकीसाठी मतदान येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. तसेच मतदानाचा निकाल 22 डिसेंबरला लागणार आहे. प्रभाग क्रमांक 2 च्या या रिक्त जागेसाठी जनसेवा मंडळ लोणी खुर्द या पॅनलकडून
डॉ. किरण प्रभाकर आहेर पाटील यांनी अर्ज भरलेला आहे तर त्यांच्या विरोधात परिवर्तन पॅनलकडून प्रभावती जनार्दन घोगरे पाटील यांनी अर्ज भरलेला आहे. या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे दोन्ही पॅनल अतिशय चुरशीने प्रचार करत आहेत. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असून दोघांचाही गावातील नागरिकांबरोबर जवळचा संपर्क आहे.
कोण कोणावर बाजी मारणार ? कोणाचा विजय होणार ? कोणाचा पराभव होणार ? हे येत्या 21 डिसेंबरच्या मतदानानंतरच कळेल.
(प्रतिनिधी – लखन गव्हाणे,लोणी)

Leave a Reply